Press "Enter" to skip to content

खारघर-मुर्बी गावातील स्मशानभूमीचे सुशोभीकरण व प्रतिक्षा दालनाचे भूमीपूजन संपन्न ! जेष्ठ नगरसेवक अभिमन्यू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश !

पनवेल : पनवेल मनपा क्षेत्रातील खारघर विभागातील मुर्बी गावाच्या स्मशानभूमीचे सुशोभीकरण व प्रतिक्षा दालनाचे भूमीपूजन नुकतेच संपन्न झाले. पनवेल मनपा अ प्रभाग माजी सभापती तथा जेष्ठ नगरसेवक अभिमन्यू पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सदर काम मार्गी लागले.

पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर, सभागृह नेते परेशदादा ठाकूर तसेच महापौर कविता किशोर चौतमोल यांच्या सहकार्याने व प्रभाग क्रमांक ४ चे मा.प्रभाग समिती सभापती तथा कार्यतत्पर नगरसेवक अभिमन्यू धर्मा पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे खारघर परिक्षेत्रांतर्गत मुर्बी गावातील स्मशान भूमीचे सुशोभीकरण व प्रतिक्षा दालनाचे भूमीपूजन गावातील ज्येष्ठ नागरिक भगवान पाटील, श्रीकांत पाटील, काशीनाथ घरत, युवानेते नितेश पाटील, मंगेश पाटील, मयूर घरत, अतुल पाटील, कुणाल पाटील, शशीकांत पाटील, रघुनाथ पाटील, सोमनाथ पाटील व सूरज गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्यावेळी नगरसेवक अभिमन्यू पाटील यांनी कामासाठी निधी मंजूर करून दिल्याबद्दल आमदार प्रशांतदादा ठाकूर ,सभागृह नेते परेश ठाकूर, महापौर कविताताई चौतमोल व अधिका-यांचे आभार मानले.