पनवेल : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सभासद नोंदणी अभियान अंतर्गत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाची डिजिटल सभासद नोंदणीसाठी गव्हाण विभाग कॉंग्रेस कमिटीची बैठक रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या उपस्थितीत समाजमंदिर हॉल शेलघर येथे पार पडली.
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा सन्मा. सोनियाजी गांधी व प्रदेशाध्यक्ष सन्मा. नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार देशात – राज्यात तसेच रायगड जिल्ह्यात डिजिटल सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात करून देशात कॉंग्रेस पक्षाचे सर्वात जास्त सभासद करण्याच्या दृष्टीने रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी गावोगावी बैठका सुरु केल्या आहेत.
या आढावा बैठकीसाठी रा. जि. कॉं. क. उपाध्यक्ष श्री मिलिंद पाडगांवकर प. ता. कॉं. क. अध्यक्ष महादेव कटेकर, ओ. बी. सी. सेलचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नंदराज मुंगाजी, मच्छीमार संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष मार्तंड नाखवा, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष अखलाख शिलोत्री, उ. वि. यु. कॉं. अध्यक्ष रोहित घरत, अंकुश म्हात्रे, अश्विन नाईक, कान्हा नाईक, यशवंत म्हात्रे, केसरीनाथ नाईक, सुरेश नाईक, प्रकाश ठाकूर, संजय खोत, अशोक म्हात्रे, आकाश म्हात्रे, अलंकार कोळी, साईनाथ साळुंखे, केसरीनाथ दापोलकर, श्याम घरत, काशिनाथ कोळी नंदकुमार कोळी, प्रकाश देशमुख, कृष्णा कोळी, अरुण कोळी अनिल घरत, शंखर देशमुख नारायण कोळी, शंभो म्हात्रे, सुनिल पाटील, चंद्रकांत घरत, किसन पाटील, अॅड श्री. प्रशांत भोईर, किरण पाटील, शैलेश पाटील, अक्षय म्हात्रे, आदी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या अध्यक्षतेखाली गव्हाण विभाग कॉंग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
More from RaigadMore posts in Raigad »







