नवी मुंबई : नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते विजय पवार यांनी आज महा-राष्ट्र विकास आघाडी पक्षात जाहीर प्रवेश केला.
वाशी येथील महा-राष्ट्र विकास आघाडीच्या कार्यालयात संपन्न झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात विजय पवार यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांसोबत प्रवेश केला. महा -राष्ट्र विकास आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी यांच्या नेतृत्वाखाली विजय पवार यांनी पक्ष प्रवेश केला.
विजय पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मागासवर्गीय सेलचे नवी मुंबई अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आज वाशी येथे विजय पवार यांनी महा-राष्ट्र विकास आघाडी पक्षात जाहीर प्रवेश केला. विजय पवार यांच्यावर पक्षाने नवी मुंबई जिल्हा मुख्य संघटक पदाची जबाबदारी दिली आहे.
महा-राष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णाराव पाटील, प्रदेशाध्यक्ष नंदेश अंबडकर, महासचिव अनिरुद्ध येचाळे यांच्या आदेशाने नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये महा-विकास आघाडी पक्षाची बांधणी सुरू असून नवीन नियुक्त्या करीत असल्याची प्रतिक्रिया प्रदेश उपाध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

विजय पवार यांचा महा-राष्ट्र विकास आघाडीत जाहीर प्रवेश !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
More from ThaneMore posts in Thane »







