Press "Enter" to skip to content

युवा नेतृत्व सचिन पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश !

पनवेल : खारघर शहरातील समाज सेवक तथा युवा नेतृत्व सचिन पवार यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. त्यांच्या सोबत अनेक युवकांनी देखील राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या हाती बांधले.

महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, महाराष्ट्र सरचिटणीस भावनाताई घाणेकर, पनवेल जिल्हा अध्यक्ष सतिश पाटील, पनवेल जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद बागल, पनवेल जिल्हा कार्यध्यक्ष शिवदास कांबळे, खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके यांच्या हस्ते पक्षप्रवेश झाला. यावेळी जेष्ठनेते राजकुमार पाटील, महिला
जिल्हा अध्यक्ष नेहा पाटील खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके ,खारघर शहर उपाध्यक्ष राहुल कोळी उपस्तिथ होते.
राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष खारघर शहर महिला अध्यक्ष राजश्री कदम यांच्या अध्यक्षतेखली हा पक्षप्रवेश झाला. युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद बागल यांनी मार्गदर्शन केले.