अलिबाग : करोना विषाणूचा ओमायक्रॉन प्रकार आता जगभरात गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात वेगाने पसरणारा प्रकार म्हणून समोर आला आहे. हे यू.एस.ए आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये प्रबळ प्रकार बनले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात आधीच एकूण 88 ओमायक्रॉन कोविड-19 प्रकरणे नोंदली गेली आहेत. गेल्या आठवड्यात राज्यात कोविड-19 ची प्रकरणेही वाढू लागली आहेत. गेल्या दोन महिन्यांत प्रथमच राज्यात दररोज 1 हजार हून अधिक पॉझिटिव्ह केसेसची नोंद होत आहे. आगामी काळात नाताळ सण, लग्नसराई, इतर सण आणि नवीन वर्ष साजरे करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या संख्येने लोक एकत्र येण्याची शक्यता आहे.
या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणखी काही निर्बंध लादणे अत्यावश्यक आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी साथरोग अधिनियम, 1897 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 व महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अन्वये प्राप्त अधिकारातून रायगड जिल्ह्याच्या हद्दीत दि.25 डिसेंबर 2021 रोजीच्या रात्री 12 वाजल्यापासून खालील अतिरिक्त निर्बंध पुढील आदेश होईपर्यंत लागू करीत आहे.
नाताळ सण हा शासन गृह विभागाकडील दि.23 डिसेंबर 2021 रोजीच्या परिपत्रकातील निर्देशानुसार साजरा केला जाईल, लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25% यापकी जे कमी असेल त्यास परवानगी असेल, इतर सामाजिक, राजकीय किंवा धार्मीक कार्यक्रम आणि मेळाव्यांच्याबाबतीत जेथे उपस्थितांची संख्या बंदिस्त जागांसाठी 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेसाठी (Open Sky) ही संख्या 250 किंवा त्या जागेच्या क्षमतेच्या 25% या पैकी जे कमी असेल त्यास परवानगी असेल, वरील दोन्ही श्रेणींमध्ये समाविष्ट नसलेल्या इतर कार्यक्रमांच्या बाबतीत बंद जागांसाठी उपस्थितांची संख्या परवाना देणाऱ्या प्राधिकाऱ्याने घोषित केलेल्या क्षमतेच्या 50% पेक्षा जास्त नसेल, तसेच जिथे आसन क्षमता निश्चित नाही अशा खुल्या जागांसाठी एकूण क्षमतेच्या 25% उपस्थितीस परवानगी असेल, क्रीडा स्पर्धा / खेळांच्या बाबतीत कार्यक्रमस्थळाच्या ठिकाणी आसन क्षमतेच्या 25% पेक्षा जास्त उपस्थितीस परवानगी नसेल.
वरील पैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या संमेलने, मेळावे इ. कार्यक्रमाच्याबाबतीत शासन, महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील दि.27 नोव्हेंबर 2021 रोजीच्या आदेशामधील तरतुदीनुसार बंद सभागृहात 100 पेक्षा जास्त नाही व खुल्या मैदानात 250 अथवा 25% या पैकी जे कमी असेल तेवढी संख्या अनुज्ञेय राहील.
तसेच उपहारगृहे, शाळा, स्पा, सिनेमागृहे आणि नाटयगृहे ही परवाना देणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याने घोषित केलेल्या आसन क्षमतेच्या 50% कार्यरत राहतील. उपहारगृह मालकांना अशा आस्थापनांच्या परवाना देणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेली पूर्ण आसनक्षमता व 50% अनुज्ञेय आसनक्षमता ठळकपणे घोषित करावी.
संपूर्ण जिल्ह्यात सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9.00 ते सकाळी 6.00 यावेळेत बंदी असेल.
हे सर्व अतिरिक्त निर्बंध शासन, महसूल व वन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील दि.27 नोव्हेंबर 2021 रोजीच्या निर्बंधासह लागू राहतील आणि हे आदेश दि.25 डिसेंबर 2021 रोजीचे रात्री 12.00 वाजल्यापासून लागू राहतील.
तसेच या आदेशातील नमूद बाबींचे उल्लघंन करणारी व्यक्ती/आस्थापना दंडात्मक कारवाईस तसेच भारतीय दंड विधान संहिता कलम 188, 269, 270, 271 तसेच आपत्ती व्यवस्थापन कलम 51 सह अन्य तरतूदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.
ओमायक्रॉनचा वाढता प्रादूर्भाव अन् नव वर्ष साजरे करण्यासाठी होणाऱ्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी सुधारित आदेश केले जारी !
More from RaigadMore posts in Raigad »