प्रभागनिहाय सुविधांचा आराखडा तयार करण्याची मागणी !
नवी मुंबई : ऐरोली-काटई उन्नत पुलाचा जर नवी मुंबईकरांसाठी उपयोग झालाच पाहिजे असे निक्षून सांगत लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी या पुलावर नवी मुंबईत चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका बांधण्याचा प्रश्न नवी मुंबई महापालिका प्रशासनाने येत्या 15 जानेवारी 2022 पर्यंत मार्गी लावला नाही तर या पुलाचे काम बंद पाडू आणि पालिका मुख्यालयातही आंदोलन करू, असा इशाराच त्यांनी दिला. सिडकोच्या वतीने प्राप्त सुविधा भुखंडांचे नियोजन करून प्रभागनिहाय सुविधा पुरविण्यासाठी आराखडा तयार करण्याची सुचना देखील त्यांनी केली आहे.
लोकनेते आमदार नाईक यांची पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासमवेत 53वी कोरोना प्रतिबंधात्मक बैठक पार पडली. या बैठकीस माजी खासदार डॉ संजीव नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर जयंवत सुतार, माजी सभागृहनेते रविंद्र इथापे, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
ऐरोली-काटई उन्नत पुलावरील मार्गिकेसाठी पालिकेची सकारात्मक भुमिका महत्वाची
ऐरोली-काटई उन्नत पुलावर नवी मुंबईत चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका होण्यासाठी पालिकेची भुमिका सकारात्मक असायला हवी, असे लोकनेते आ. नाईक म्हणाले. या पुलाची निर्मिती करीत असलेल्या एमएमआरडीए प्राधिकरणाने पालिकेकडून काही बाबींची पुर्तता होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहेजमिन संपादनाचा विषय असो की एमएमआयडीएला निधी देण्याचा विषय असो . पालिकेने त्यावर तत्परतेने कार्यवाही करावी. मार्गिकेच्या कामासाठी पालिकेने एका अधिकाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक करावी, अशी सुचना केली. संदीप नाईक यांनी या संदर्भात आयुक्तांना सुचना करताना पालिकेने एमएमआरडीए तसेच सिडको या दोन्ही प्राधिकरणांच्या संपर्कात राहण्यास सांगितले. या पुलावर नवी मुंबईत मार्गिका तयार झाल्यास ठाणे-बेलापूर मार्गावरील 40 टक्के वाहतुकीची समस्या सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आयुक्त बांगर यांनी पालिका 35 करोड रूपये खर्च करण्यास तयार असल्याची माहिती देवून पुलाच्या आड येणारा जलकुंभ आणि जमिन संपादनासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. एमएआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मार्गिकांचे काम सुनिश्चित केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सुविधा भुखंडांसाठी पालिकेने टप्प्याटप्प्याने सिडकोला पैसे देण्याची तयारी दाखवावी
नवी मुंबई पालिकेने विकास आराखडण्यात आरक्षण टाकलेल्या 500 चौरस मिटरवरील भुखंड सिडकोने देण्यास नकार दिला असून राज्य शासनाने हे भुखंड विकण्यास सिडकोला परवानगी दिली आहे. त्यामुळे नवी मुंबईला भविष्यात सोयी सुविधा पुरविताना भुखंडच उपलब्ध नसणार आहेत. नवी मुंबईच्या भवितव्याशी कोणाला खेळू देणार नाही, अशी आक्रमक भुमिका घेत लोकनेते आ. नाईक यांनी हा विषय विधानसभा अधिवेशनात जोरदार मांडला. सुविधा भुखंडाची किंमत अदा करण्यास पालिका सक्षम नाही, असा युक्तीवाद शासनाच्या वतीने करण्यात आला असून तो चुकीचा असल्याचे त्यांनी पालिका आयुक्तांकडे स्पष्ट केले. सिडकोने सुविधा भुखंड नाममात्र दराने पालिकेकडे हस्तांतर करावे. पालिकेने टप्प्याटप्प्याने त्याचे पैसे सिडकोला अदा करावेत, असे लोकनेते नाईक म्हणाले. तर नागरी आरोग्य केंद्रे, रूग्णालये, शाळा यांसाठी प्राधान्याने भुखंड मागून घेण्याची मागणी संदीप नाईक यांनी केली. सिडकोकडून प्राप्त होणाÚया भुखंडांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात सोयी सुविधा पुरविण्याचा आराखडा तयार करावा. त्याची यादी करून सिडकोकडे ती सुपूर्द करावी. आरक्षणाबाबत येत्या 7 जानेवारी 2022 रोजी या विषयी उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीत पालिकेने ठासून आपली भुमिका मांडावी. यावर पालिकेच्या वकीलांसोबत बोलून शहरहिताची भुमिका मांडण्याची तयारी आयुक्त बांगर यांनी दर्शवली. सुविधा भुखंडाचे पैसे अदा करण्यास पालिका सक्षम असून कोरोना काळात अनावश्यक झालेल्या करोडो रूपयांच्या कामांचा संदर्भ देत लोकनेते नाईक यांनी पालिकेने आवश्यक कामांवर खर्च करावा, असे स्पष्ट केले.
पालिका अधिकाऱ्यांच्या आर्शिवादाने शहरात विनापरवाना फेरिवाल्यांचा सुळसुळाट
पालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या संगणमताने नवी मुंबईत सर्वच प्रभागात फेरिवाल्यांचा सुळसुळाट झाला आहे त्याचा प्रचंड त्रास नागरिकांना होतो आहे. काही भ्रष्ट अधिकारी आयुक्तांना चुकीची माहिती देवून त्यांची दिशाभूल करीत आहेत. आयुक्तांनी ही बाब तपासावी आणि अशा अधिकाऱ्यांवर दोषी आढळल्यास निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी लोकनेते आ. नाईक यांनी केली. फेरिवाल्यांवरील कारवाई दिखावू असते. कारवाई झाली की काही क्षणातच फेरिवाले पुन्हा प्रगटतात. त्यामुळे प्रत्येक नोडमध्ये आणि रेल्वे स्थानकांच्या पूर्व व पश्चिम भागात विनापरवाना फेरिवाल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची सुचना त्यांनी केली. जर योग्य कारवाई झाली नाही तर नाईलाजास्तव काळे कपडे परिधान करून आयुक्तांविरोधात निषेध आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला. यावर कायमस्वरूपी अधिकारी नेमूण फेरिवाल्यांवरील कारवाई तीव्र करण्यात येईल, असे आयुक्त बांगर म्हणाले.
प्रभागांमध्ये स्वच्छतेचा बोजवारा
सध्या शहरातील अनेक प्रभागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. काही कामचुकार अधिकारी आणि ठेकेदारांमुळे जनतेला त्रास भोगावा लागतो आहे. स्वच्छतेच्या पुरस्कारांसाठी पालिकेचा गौरव होत असताना अशी अस्वच्छता लौकीकास साजेशी नाही त्यामुळे काटेकोरपणे साफसफाई ठेवण्याची मागणी लोकनेते नाईक यांनी केली. त्यावर स्वच्छता अधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यांना कडक सुचना करू, असे आयुक्त बांगर म्हणाले.
शाळा इमारतींची दुरूस्ती करावी
पहिली ते सातवीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा इमारतींची दुरूस्ती, रंगरंगोटी करावी. निर्जंतुकीकरण करावे. अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहे का ते तपासावे. कोरानोची खबरदारी कोटेकोरपणे घ्यावी, अशा महत्वपूर्ण सुचना लोकनेते नाईक यांनी केल्या असता आयुक्त बांगर यांनी कार्यवाही करण्याबाबत त्यांना आश्वस्त केले. ही कामे चांगल्या पध्दतीने होण्यासाठी शाळांना अतिरिक्त कर्मचारीवर्ग आणि निधी देण्याची सुचना संदीप नाईक यांनी केली. त्यासाठी आयुक्तांनी होकार दर्शवला.
कोरोना व ओमायक्रॉन रूग्णांचा वाढता धोका पाहता यंत्रणा सज्ज ठेवावी
नवी मुंबईत कोरानाचे आकडे वाढत आहेत. ओमायक्रॉनचे रूग्णही सापडत आहेत. जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने त्यांची आरोग्य व वैद्यकीय उपचारांची यंत्रणा सुसज्ज ठेवण्याची सुचना लोकनेते नाईक यांनी केली. डॉक्टर, परिचारिका, औषधे, ऑक्सिजन सर्वाची तयारी ठेवण्याची सुचना त्यांनी केली.
मुलांच्या लसीकरणाचे योग्य नियोजन करावे
केंद्र सरकारने जाहिर केल्याप्रमाणे 3 जानेवारीपासून बालकांच्या लसीकरणाचा कार्यक्रम हाती घ्यायचा आहे. या अनुशंगाने बालकांना कोणताही त्रास न होता त्यांचे सुरळीतपणे लसीकरण केले जाईल, याची काळजी घेण्याचे आवाहन लोकनेते आमदार नाईक यांनी केले. बालकांप्रमाणेच आघाडीचे कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठांनाही लसीचा बुस्टर डोस दिला जाणार आहे. वेळापत्रक ठरवून लसीकरण पूर्ण करण्याची सुचना त्यांनी केली.
आयुक्त बांगर यांनी लसीकरणावर निवेदन करताना लसीकरण केंद्र वाढविण्यात येतील. जम्बो लसीकरण केंद्रांची संख्या वाढवू. पालिका हददीत बालकांसह सुमारे सव्वा तीन लाख जणांचे कोरोना लसीकरण करायचे असून एक महिन्यांच्या आत हे लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे नमूद केले.
लसीकरणासाठी घर घर दस्तक
कोराना लसीचा दुसरा डोस चुकविणाऱ्याची संख्या देखील मोठी आहे. कोरोनापासून बचावासाठी लस हे सुरक्षा कवच असल्याने घरोघरी शोध घेवून दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करावे. कोरोना संपल्याचा समज झाल्याने अनेक लोक मास्क परिधान करीत नाहीत. मास्क परिधान करण्यासाठी जनजागृती करावी.
दिव्यांगांना स्टॉल द्या
शहरातील दिव्यांगांनी उदरनिर्वाहासाठी पालिकेकडे केलेले अनेक अर्ज प्रलंबित आहेत याकडे लोकनेते नाईक यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. सिडकोकडून प्राप्त भुखंडांवर एकाच ठिकाणी दिव्यांगांना स्टॉल देण्याची व्यवस्था करण्याचा सल्ला दिला. त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.
गवळीदेव, सुलाईदेवी धार्मिैक पर्यटन स्थळांमध्ये साफसफाई ठेवा, सुविधा द्याव्यात
गवळीदेव आणि सुलाईदेवी ही नवी मुंबईतील दोन धार्मिक पर्यटनस्थळे आहेत मात्र त्या ठिकाणी अस्वच्छता दिसते. सुविधांचा आभाव आहे. पालिकेने आतापर्यत अडीच कोटीचा निधी या दोन पर्यटनस्थळांसाठी दिला आहे. त्याचा सुयोग्य विनियोग झालेला दिसत नाही. त्यामुळे पालिकेनेच या ठिकाणी सुविधा देण्यासाठी आराखडा तयार करावा आणि तो वन विभागाला देवून संबधित कामे होतील, याची खात्री करावी, अशी मागणी लोकनेते नाईक यांनी केली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेवून कार्यवाही करू, असा सकारात्मक प्रतिसाद आयुक्त बांगर यांनी दिला.
बैठकीत केलेल्या अन्य महत्वाच्या सुचना…
घणसोली नोडमध्ये अनियमित पाणीपुरवठा सुरळीत करावा. दुषित पाणीपुरवठयामुळे नागरिकांना उलटी, जुलाब सारखे त्रास होत आहेत. यावर कार्यवाही करावी. रासायनिक कंपन्यांनी सांडपाणी सोडल्याने येथील नाला प्रदुषित झाला आहे. संबधीत कंपन्यांवर कारवाई करावी.
महापे शिळ मार्ग येथे फेरिवाले आणि अन्न विक्रेते अ्रस्वच्छता करतात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी नेमणूक करावी.
सीबीएसईच्या शाळा विभागवार सुरू करण्यासाठी नियोजन करावे.
विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीचे रक्कम वर्ग करावी.
ऐरोलीतील पालिका रूग्णालयासाठी लवकरात लवकर अग्निशमन व अन्य परवाने देेेवून येथील अतिदक्षता विभाग सुरू करावा. छोटया मोठया शस्त्रक्रीयांचे सुविधा तातडीने सुरू करावी.
ऐरोली-काटई उन्नत पुलावर नवी मुंबईतील मार्गिकांसाठी 15 जानेवारीची अंतिम मुदत अन्यथा काम बंद पाडू, लोकनेते आ. गणेश नाईक यांचा इशारा !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
More from ThaneMore posts in Thane »