Press "Enter" to skip to content

उलवे मधील आरक्षित गार्डन प्लॉट घेणार मोकळा श्वास, “शे.का.प. आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा पुढाकार” !

पनवेल : 29 डिसेंबर 2021 रोजी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्ष उलवे आणि विरोधी पक्षनेते .प्रितम म्हात्रे यांच्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून उलवे नोड 2 येथे “स्वच्छता मोहिमेचे” नियोजन 26 डिसेंबर रोजी सेक्टर 17 उलवे येथे करण्यात आले होते.
उलवे नोड 2 मधील बरेचसे गार्डन प्लॉट हे अतिक्रमण आणि डेव्हलप न झाल्यामुळे नागरिकांना वापरात येत नव्हते. सदर आरक्षित प्लॉटवरील स्वच्छतेची जबाबदारी शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून करण्याचा निर्धार विरोधी पक्षनेते .प्रितम म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून आमदार .बाळाराम पाटील साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी कामगार पक्ष कार्यालय सेक्टर 17 उलवे येथील कार्यालयाच्या ठिकाणी सकाळी नऊ वाजता सदर मोहिमेचा शुभारंभ झाला. याप्रसंगी श्री. राजेंद्र घरत (उपाध्यक्ष, भात गिरणी पनवेल )
श्री.सचिन राजे येरुणकर,श्री. रोहन खंडू,श्री. संदीप पाटील,श्री. निलेश पाटील,श्री. किशोर कदम,श्री. मंगेश सावंत,श्री. प्रकाश सुर्वे,श्री. संकेत जाधव,श्री. चव्हान,श्री. विनोद थोरात,श्री. विलास चदेल,श्री.सुरेश फाटक,श्री. सुरज देवकर,श्री. विशाल देवकर,श्री. योगेश बावकर,श्री.अमित जस्वाल,श्री. प्रथमेंष पास्ते व इतर स्थानिक नागरिक उपस्थित होते.
उलवे नोड 2 मध्ये नव्याने निर्माण झालेल्या वसाहतीमध्ये सिडकोच्या माध्यमातून अजूनही काही सेवा अपुऱ्या आहेत त्या सेवा मिळवून देण्यासाठी आज पर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांचे नेहमीच सहकार्य मिळत आले आणि गार्डन प्लॉट स्वच्छ करून नागरिकांना खुले करून देण्याच्या या स्तुत्य उपक्रमा बद्दल उपस्थित ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गातून आभार मानण्यात आले