Press "Enter" to skip to content

ऐरोलीत एकाच छताखाली सर्व शासकीय दाखले मिळणार ! लोकनेते आ. गणेश नाईक यांच्या हस्ते सेवाकेंद्राचे उदघाटन !


नवी मुंबई / सुजित शेळके :

शिक्षण, रोजगार व अन्य कामांसाठी आवश्यक शासकीय दाखले मिळविण्यासाठीठी होणारी नागरिकांची वणवण आता थांबणार असून ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या पुढाकाराने व भाजपाच्या वतीने सर्व षासकीय दाखले एकाच ठिकाणी मिळू षकतील यासाठी ऐरोलीत सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या सेवा केंद्राचे उदघाटन बुधवार, 22 डिसेंबर 2021 रोजी लोकनेते आमदार गणेष नाईक यांच्या शुभ हस्ते उत्साही वातावरणात करण्यात आले.
ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, स्थायी समितीचे माजी सभापती अनंत सुतार यांच्यासह लोकप्रतिनिधी, भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक व स्थानिक रहिवासी उपस्थित होते. कोरोनाची खबरदारी पाळून हा कार्यक्रम पार पडला. स्थानिक आमदार लोकनेते नाईक यांच्या ऐरोली सेक्टर 6, प्लॉट नंबर 14 येथील ब्लॅक स्मिथ टॉवरमधील जनसंपर्क कार्यालयात हे लोकोपयोगी सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. गरीब आणि गरजू नागरिकांना या सेवा केंद्रातून विनामुल्य दाखले मिळणार आहेत. अन्य नागरिकांना शासकीय शुल्कात हे दाखले उपलब्ध होणार आहेत. विविध कामांसाठी शासकीय दाखले मिळविताना नागरिकांची परवड होत असते. अनेकवेळा नागरिकांच्या असहायतेचा फायदा उठवतं दलाल मंडळी दाखले मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळत असतात. नागरिकांना दिलासा देण्यासाठी संदीप नाईक यांनी पुढाकार घेत दाखले प्राप्त करून घेण्यासाठी सेवा केंद्राच्या माध्यमातून एक कायमस्वरूपी उपक्रम सुरू केला आहे. दिघा, ऐरोली, रबाळे, घणसोली या भागातील नागरिकांना प्रामुख्याने त्याचबरोबर संपूर्ण नवी मुंबईकरांना या सेवा केंद्राचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर जेथून मागणी येईल तेथे या सेवा केंद्राच्या माध्यमातून विभागवार दाखले वाटप शिबिरे भरविण्यात येणार आहेत, अशी माहिती संदीप नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. संदीप नाईक म्हणाले, ”जेव्हां इतर पक्ष राजकारण करण्यात गुंतले होते तेव्हां लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या निर्देशानुसार भाजपाचे कार्यकर्ते कोरोना काळात कर्तव्य भावनेने जनतेची मदत करीत होते. शैक्षणिक, आरोग्य व वैद्यकीय सुविधा मिळवून देत होते. सार्वजनिक स्वच्छतेची काळजी घेत होते. आवश्यक वस्तूंचे वाटप करीत होते. लोकनेते नाईक यांनी आम्हा सर्वांना स्पष्ट संदेश देत राजकीय कार्यक्रम थांबवा आणि नवी मुंबईकरांना संरक्षित करण्याठी फक्त आणि फक्त कोरोनाचे मदतकार्य करण्यास सांगितले“ लोकनेेते नाईक यांनी सुरूवातीला समाजमाध्यंमातून महापालिकेसह विविध शासकीय-निमशासकीय यंत्रणांशी संवाद साधून त्यांच्याकडून कोरोना प्रतिबंधाची प्रभावी अंमलबजावणी करून घेतली. लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, अनेक स्वयंसेवी संस्थांबरोबर संवाद करीत त्यांच्या अडचणींची सोडवणूक केली. सत्ता असूनही मागील 25 वर्षात नवी मुंबई महापालिकेत केवळ चार ते पाच वेळा जाणारे लोकनेते आमदार नाईक कोरोना काळात जनतेच्या प्रष्नांची सोडवणूक करण्याठी तब्बल 53 वेळा पालिका मुख्यालयात गेले. लोकनेते आमदार नाईक यांनी कार्यकर्त्यांसह कोरोना काळात मदतकार्यासाठी स्वतःला झोकून दिले. सेवा केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी, युवकांना नोकरीसाठी, सर्वसामान्यांना शासकीय कामांसाठी तसेच ज्येष्ठांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी असे सर्व प्रकारचे दाखले मिळविता येणार आहेत. खासकरून राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ कसा मिळवावा, याचे मार्गदर्षन देखील या सेवा केंद्रातून नागरिकांना केले जाणार आहे.
लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांच्या कामाचे कौतुक करीत भाजपाचा कार्यकर्ता हा केवळ राजकारण करणारा नाही तर जनतेची सेवा करणारा आहे, असे सांगितले. लोकनेते आ. नाईक यांनी विरोधकांना फटकारले. पालिका निवडणुक जवळ आल्याने विरोधकांनी जनतेला प्रलोभने व  आमिष दाखविण्यास सुरूवात केली आहे. गुंडगीरी सुरू केली आहे. या गुंडांचा पोलीसांनी बंदोबस्त करावा अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने त्यांचा बंदोबस्त करण्यास समर्थ आहोत, असा इशारा लोकनेते आ. नाईक यांनी विरोधकांना दिला. मुंबई, ठाण्याची वाट लावल्यानंतर विरोधकांची वाईट नजर नवी मुंबईवर पडली आहे. मात्र आम्ही नवी मुुंबईच्या भवितव्याशी कुणालाही खेळू देणार नाही. विरोधकांनी सत्तेचा गैरवापर सुरू केला आहे. विकास आराखडयात आरक्षित नवी मुंबईच्या हक्काचे 500 चौरस मिटरवरील सुविधा भुखंड सिडकोला विकण्याची परवानगी राज्याच्या नगरविकास खात्याने दिली आहे. पुनर्विकासाच्या नावे सिडको इमारतीमधील सदनिकाधारकांचे नुकसान करू लागले आहेत. पालिकेच्या मतदार याद्यांमध्ये गोंधळ  करीत आहेत. प्रभाग रचना स्वतःच्या फायद्यासाठी बदलत आहेत. नवी मुंबईचा आतापर्यत झालेला नेत्रदिपक विकास नवी मुंबईकरांनी पाहिला आहे. 1995पासून नवी मुंबईकरांनी विष्वास ठेवून नवी मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी पालिकेत सत्ता कायम ठेवली आहे. कितीही हातपाय आपटा मात्र  आगामी निवडणुकीतही बहुमत सिध्द करण्यासाठी आवश्यक संख्याबळ जनता आपल्याला नकीच देईल, असा विश्वास लोकनेते आ. नाईक यांनी व्यक्त केला. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ऐरोली येथील जनसंपर्क कार्यालयात महिन्यातून चार वेळा उपस्थित राहणार आहे, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. 
चौकट…
ऐरोली पूर्वीपेक्षा भक्कम
राज्यात अलिकडेच झालेल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या. राज्यातील जनमताचा कौल भाजपाच्याच बाजूने आहे. ऐरोली नोडमध्ये भाजपा पूर्वीपेक्षा अधिक भक्कम झाली असून पालिका निवडणुकीत येथील निकाल भाजपाच्याच बाजूने लागतील असे लोकनेते आमदार गणेश नाईक ठासून म्हणाले.