अलिबाग : सामाजिक न्याय विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबळीकरण योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द भूमीहीन शेतकऱ्यांकरिता कोरडवाहू 4 एकर किंवा बागायत 2 एकर जमीन उपलब्धततेनुसार देण्यात येते.
या योजनेकरिता जातीचा दाखला सत्यप्रत, उत्पन्नाचा दाखला सत्यप्रत, भूमीहीन शेतमजूर असल्याचे प्रमाणपत्र, दारिद्रयरेषेखाली असल्याबाबतचे प्रमाणपत्र, महिलांसाठी विधवा/परित्यक्ता/घटस्फोटित असल्याचा दाखला/पतीच्या मृत्युचे प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र, रहिवासी दाखला/कितीवर्षे रहिवाशी आहेत याबाबत ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र, रेशनकार्डची सत्यप्रत, वयाबाबतचा पुरावा/शाळा सोडल्याचा दाखला/निवडणूक प्रमाणपत्र, महसूल व वन विभागाने गायरान व सिलींगच्या जमिनीचे वाटप केले नाही, याबाबत प्रतिज्ञापत्र या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, कच्छी भवन, नमिनाथ जैन मंदिरा जवळ, सेंटमेरी स्कुलसमोरील श्रीबाग रोड, अलिबाग या कार्यालयास संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण श्री. सुनिल जाधव यांनी कळविले आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भूमीहीन शेतमजूरांनी शेतजमीन मिळण्याकामी अर्ज सादर करावेत !
More from RaigadMore posts in Raigad »



