पनवेल : राष्ट्रीय मजदुर कॉंग्रेस (इंटक) या राष्ट्रीय संघटनेबरोबर संलग्न असलेली नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्लॅाईज चे २२ वे राष्ट्रीय व महाराष्ट्र गोवा सर्कलचे २६ वे अधिवेशन इंटकचे राष्ट्रीय सचिव तथा रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सन्मा. श्री. महेंद्र घरत यांच्या अध्यक्षतेखाली श्री. क्षेत्र आळंदी देवाची येथे संपन्न झाले.
कोरोना काळात डॉक्टर, पोलीस या कोरोना योद्धांच्या प्रमाणेच पोस्टल कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले. अतिशय दुर्गम भागात जेथे रस्ते, इंटरनेट ची सुविधा नाही अश्या दुर्गम भागात पोस्ट कर्मचारी पोहोचून नागरिकांना शहराशी जोडून ठेवण्याचे काम करत असतात अश्या कर्मचाऱ्यांचे श्री. महेंद्र घरत यांनी अभिनंदन केले. तसेच आजपर्यंत इंटकचा नेता म्हणून पोस्टल कर्मचार्यांच्या नेहमीच पाठीशी उभा राहतोय. यापुढेही पाठीशी उभा राहीन असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. या अधिवेशनासाठी देशभरातून ८०० कर्मचारी उपस्थित होते. विविध राज्यातून आलेल्या सन्माननीय व्यक्तींचा श्री. महेंद्र घरत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

पोस्टल एम्लॅाईज युनियनचे राष्ट्रीय अधिवेशन महेंद्र घरत यांच्या अध्यक्षतेखाली देवाची आळंदी येथे संपन्न !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
- 5 ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चा उद्घाटन समारंभ
- लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये “ऋतू हिरवा” अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन !
More from RaigadMore posts in Raigad »







