पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 18 मधील स्वामी नित्यानंद मार्ग रस्त्याच्या काँक्रीट रोड गार्डन हॉटेल ते पनवेल महानगरपालिका मुख्यालय या दोन्ही बाजूस रस्ता रुंदीकरण सह पावसाळी गटार बांधणे फुटपाथ बांधणे आणि इतर अनुषंगिक कामे करणे या कामास पनवेल महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता मिळाली आहे. या कामासंदर्भात पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते माननीय श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे नगरसेविका सुरेखा विलास मोहोकर, नगरसेविका प्रीती जॉर्ज, नगरसेविका सारिका भगत यांनी पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून सातत्याने पाठपुरावा केलेला आहे.
पनवेल महानगर पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 18 मध्ये स्वामी नित्यानंद रोडवरील काँक्रीट रोड येथील गार्डन हॉटेल ते पनवेल महानगरपालिका मुख्यालय पर्यंतचे रस्त्याचे काँक्रिटीकरण झालेले आहे. सदर रस्त्याचे रुंदीकरण करून दोन्ही बाजूस पावसाळी गटार बांधणे फुटपाट बांधणे हे काम बाकी आहे सदर कामासाठी लागणाऱ्या जागेची भूसंपादन काम नगर रचना विभाग यांच्यामार्फत सुरू आहे नगररचना विभागाने दोन्ही बाजूस पावसाळी गटार बांधणे, फुटपाथ बांधणे आणि इतर अनुषंगिक कामे करणे हे काम सुरू करण्याबाबत सूचित केले होते. सदर प्रस्तावित कामांमध्ये फ्लेक्सिबल पेमेंट पावसाळी गटारात पाच स्वीट लाईट शिल्लक असलेले काँक्रीट पेमेंट मधील खोदकाम करण्यासाठी दोन्ही बाजूस पाण्याच्या लाईन टाकणे, विद्युत व दूरसंचार केबल टाकणे याकरिता ह्युम पाईप टाकणे, कामास अडथळा येणाऱ्या कुंपण भिंत तोडून नवीन बांधणे इत्यादी कामांचा समावेश असलेल्या ९,९८,८८,४०५/- रुपयाच्या अंदाजपत्रकाला दि.२०/१२/२०२१ रोजीच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. सभागृहात बोलताना विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी ज्या सोसायटीचे भूसंपादन करण्यात येणार आहे त्यांना योग्य तो कंपेसेशन द्यावे ही मागणी केली आहे. तसेच ज्या सोसायट्यांचे जमिनी या कामात जाणार आहेत अशा सोसायटीच्या नागरिकांचे विविध मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी सभागृह पुढे मांडली.

स्वामी नित्यानंद मार्ग रस्त्याच्या काँक्रीट रोड होण्यास महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता, विरोधी पक्षाच्या मागणीला यश !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
- 5 ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चा उद्घाटन समारंभ
- लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये “ऋतू हिरवा” अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन !
More from RaigadMore posts in Raigad »







