Press "Enter" to skip to content

नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने केला कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध ! छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे देशाच्या अस्मितेचा अवमान ! जिल्हाध्यक्ष अशोक गावडे !

नवी मुंबई : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे देशाच्या अस्मितेचा अवमान आहे. कर्नाटक मध्ये जे घडले ते अत्यंत निंदनीय आहे. महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबने सारख्या घटना कर्नाटक राज्यामध्ये घडतात, हे कर्नाटक सरकारचे अपयश आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी जोरदार हल्लबोल चढवीत कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध केला.

संपूर्ण देशाचे आराध्यदैवत छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्नाटक राज्यातील बैंगलोर येथील सदशिवनगर येथे महाराजांच्या पुतळ्याचे विटंबन केल्याच्या निषेधार्थ नवीमुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध वाशी येथील शिवाजी महाराज चौकात करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून व पुष्पहार अर्पण करण्यात आला. काही संकुचित वृती असणाऱ्या विकृत भाजपाच्या समाजकंटकांनी ही विटंबना करून सबंध देशातील शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या आहेत. छ्त्रपती शिवाजी महाराज हा राजकारण करण्याचा विषय नाहीत तर सर्व शिवप्रेमींच्या अस्मितेचा विषय आहे, असे देखील जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी यावेळी नमूद केले . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कर्नाटक सरकारचा घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला.

जिल्हाध्यक्ष नवीमुंबई अशोक अंकुशराव गावडे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या निषेध आंदोलनात राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील ,जिल्हा कार्याध्यक्ष, जी एस पाटील , नगरसेवक राजू शिंदे , नगरसेविका स्वप्नाताई गावडे (गायकवाड ),सेवादलचे अध्यक्ष संतोष आहेर, भोजमल पाटील ,तालुका अध्यक्ष बेलापूर अरुण कांबळे, तालुका अध्यक्ष घणसोली संदीप लटाम्बळे , तालुका अध्यक्ष कोपरखैरणे मोहन पाडाळे, तालुका अध्यक्ष तुर्भे नियाज शेख,तालुका अध्यक्ष ऐरोली रेवनसिद्ध माने,तसेच महिला जिल्हा अध्यक्षा प्राजक्ता मोंडकर, विजया कदम, मनीषा देसाई, निर्मला वायकर,सुनीता देशमुख, लटाम्बळे ताई, विद्यार्थी सेना अध्यक्ष अक्षय बोराडे, ओंकार कळंबे, प्रवीण लोकरे, रुपेश गायकवाड,आणि इतर तालुका,वार्ड, युवा सेना आणि सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »