पनवेल :कोकण एज्युकेशन सोसायटीचा १०४ वा वर्धापन दिन वि. के .हायस्कूलच्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी शाळा समिती सभापती व शिक्षक आमदार बाळाराम पाटील साहेब यांनी ध्वजारोहण केले. यावेळी विरोधी पक्षनेते व शालेय समितीचे सदस्य प्रीतम म्हात्रे, इंदूबाई वाजेकर इंग्रजी माध्यमाचे सभापती व्ही.सी.म्हात्रे , वि.के .विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व संकुल प्रमुख पी.बी ठाकूर संकुलातील सर्व मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते.
२५ मे १९१८ रोजी कुलाबा स्टुडेंट असेसिएशन या रोपट्याचे रुपांतर कोकण एज्युकेशन सोसायटी या ग्रुपच्या झाले १५ ऑगस्ट १९१८ रोजी संस्थेचे पहिले संचालक मंडळ अस्तित्वात आले.
गंगा शिक्षणाची नेली गावोगावी ||
को.ए.सो ने केली क्रांती नवी ||
विद्यार्थी जर शाळेपर्यंत येऊ शकत नसतील तर शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली पाहिजे हा महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार प्रत्यक्ष कृतीत आणला तो को.ए.सो. चे माजी अध्यक्ष माननीय लोकनेते ऑड. दत्ता पाटील यांनी, प्रभाकर पाटील यांच्या सोबतीने गावोगावी शाळा सुरू केल्या खेडोपाडी गोरगरिबांना शिक्षण सहज उपलब्ध करून दिले. आज को.ए. सो. चे विद्यार्थी देशात विदेशात सन्मानाच्या पदावर कार्यरत आहेत.
१८ डिसेंबर १९२४ रोजी संस्थेने थोर शिक्षणकार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या शुभहस्ते आपला रौप्य महोत्सव साजरा केला त्याची आठवण म्हणून आजही १८ डिसेंबर हा दिवस संस्थेचा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. रायगड जिल्ह्यातील खंबीर क्रांतिकारी नेतृत्व व जहाल व्यक्तिमत्व असलेल्या दत्ता पाटील यांनी १९७०साली कार्याध्यक्ष पद स्वीकारले त्यानंतर संस्थेच्या जवळजवळ सर्व शाळा ग्रामीण परिसरात देखील सुरू झाल्या.
संस्थेचा शाखा विस्तार थोडक्यात पाच महाविद्यालय ४० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तीन विनाअनुदानित माध्यमिक शाळा १० मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळा सात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सात इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाला पाच व्यवसाय अभ्यासक्रम विभाग असलेल्या शाळा अशा एकूण ७० रायगड सिंधुदुर्ग व ठाणे या जिल्ह्यात विशेषत खेड्यात विखुरलेल्या आहेत. ज्ञानदानाचे उत्तम काम करत आहेत. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष संजयभाई पाटील उत्तमरीत्या सांभाळत आहेत.

कोकण एज्युकेशन सोसायटीचा १०४ वा वर्धापन दिन वि. के .हायस्कूलच्या प्रांगणात उत्साहात साजरा !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
More from RaigadMore posts in Raigad »







