Press "Enter" to skip to content

आधार मोबाईल लिंकिंग विशेष मोहीम ! ७६ ज्येष्ठ नागरिकांनी घेतला लाभ !

पनवेल : युवाप्रेरणा सामाजिक संस्था आणि नवी मुंबई पोस्टल विभागाच्या वतीने खारघर येथे आयोजित केलेल्या आधार मोबाईल लिंकिंग विशेष शिबिराचा ७६ ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला. ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र खारघर येथे आयोजित केलेल्या शिबिरासाठी स्थानिक नगरसेविका नेत्रा पाटील आणि सामाजिक नेते किरण पाटील यांचा विशेषत्वाने पुढाकार होता.
पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इ काढण्यासाठी उपयुक्त होते, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी, बँक तसेच डी मॅट खाते उघडण्यासाठी, शासनाच्या विविध योजनांचे लाभ प्राप्त करण्यासाठी, आपल्या आधारचा इतरांकडून होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी आधारला मोबाईल लिंकींगचा फायदा होणार आहे .आजच्या शिबिरात एकूण ७६ ज्येष्ठ नागरिकांनी आधार मोबाईल लिंकिंग विशेष मोहिमेचा लाभ घेतला. त्यामुळे नवी मुंबई पोस्टल विभागात खारघर पोस्ट ऑफिसचा नवी मुंबईत पहिला क्रमांक आला. खारघर पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्टर यांनी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांचे सदर मोहीम आयोजित केल्याबद्दल धन्यवाद व आभार मानले.