Press "Enter" to skip to content

खारघर येथे कंटेनर टॉयलेटचे उदघाटन ! नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांच्या प्रयत्नांना यश !

पनवेल : पनवेल मनपा प्रभाग क्रमांक ५ खारघर येथे कंटेनर टॉयलेटचे उदघाटन पनवेल मनपा सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विभागामध्ये कंटेनर टॉयलेटची आवश्यकता होती, तशी मागणी रहिवाशांकडून होत होती. सदर मागणीची गरज लक्षात घेऊन स्थानिक नगरसेविका हर्षदा उपाध्याय आणि युवानेते अमर उपाध्याय यांनी पनवेल पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि मागणी मेनी करून घेतली. सदर कंटेनर टॉयलेटचे उदघाटन सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जेष्ठ नगरसेवक अभिमन्यू पाटील, नगरसेवक रामजी बेरा, नगरसेवक नरेश ठाकूर, भाजप युवानेते समीर कदम, भाजप खारघर नेते वासुदेव पाटील, भाजप उपाध्यक्ष संजय घरत, उपाध्यक्ष दिलीप जाधव, भाजप युवक अध्यक्ष विनोद घरत, भाजपनेते मनोज शारबिद्रे, भाजपनेते राजेन्द्र मांजरेकर, महिला अध्यक्षा वनिता पाटील, भाजप पदाधिकारी निर्दोष केणी, साजिद पटेल, मनोज शारबिद्रे, रायगड जिल्हा चिटणीस गीता चौधरी, भारत मंचच्या अध्यक्षा बिना गोगारी, भाजप सोशलमिडीया नेत्या मोना अडवाणी, भाजप नेत्या संध्या शारबिद्रे, सीमा खडसे, गुरुनाथ म्हात्रे, प्रतीक्षा कदम, अंकिता वारंग, शोभा मिश्रा, अक्षय पाटील आदी पदाधिकारी तसेच रहिवाशी उपस्थित होते.