Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी सुदाम पाटील ! उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्ते सुदाम पाटील यांना नियुक्ती पत्र !

पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदारपणे एंट्री केलेले पनवेलचे नेते सुदाम पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्ते सुदाम पाटील यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

सुदाम पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याच वेळी सुदाम पाटील यांना राष्ट्रवादी मध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळेल हे निश्चित झाले होते. गुरुवारी पनवेलमध्ये आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सुदाम पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल नियुक्ती पत्र देण्यात आले.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »