राम भोस्तेकर /माणगाव : तामिळनाडूतील कुन्नूर येथे भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली होती या दुर्घटनेत देशाचे संरक्षण दलप्रमुख जनरल बिपीन रावत गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला .देशासाठी ही सर्वात धक्कादायक अशी घटना आहे. रावत यांचे निधन झाल्याच्या वृत्ताला भारतीय हवाईदलाने दुजोरा दिला.
दरम्यान, बिपीन रावत यांच्या निधनाने देशावर मोठा आघात झाला आहे. २०२० मध्ये रावत यांच्याकडे संरक्षण दल प्रमुखपदाची धुरा देण्यात आली होती. ते देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) ठरले. संरक्षण दल प्रमुख म्हणून आणि त्याआधी लष्करप्रमुखपदावर असताना रावत यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाची ऑपरेशन्स झाली. रावत यांचा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला असून या दुर्घटनेच्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले गेले आहेत.
असे हे शूरवीर देशाचे पहिले आणि विद्यमानसरसेनाध्यक्ष(Chief of Defence Staff)
तसेच माजी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात तामिळनाडमधील कुंन्नूर जवळ दुर्दैवी निधन झाले. यांना व दुर्घटनेत मृत झालेल्या १३ लष्करी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता गुरुवार, दि. ९ डिसेंबर २०२१ रोजी गोरेगाव (माणगांव)येथे कार्यक्रम घेण्यात आला.व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या कार्यक्रमावेळी उपस्थित अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले

गोरेगाव शहर भाजप कडून भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत व १३ लष्करी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण !
More from RaigadMore posts in Raigad »



