Press "Enter" to skip to content

विळे ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण क्षेत्र बंदिस्त प्रकरण ! प्रफुल्ल घरटकर १४ डिसेंबर रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यलयासमोर उपोषण करणार !

राम भोस्तेकर /माणगाव : माणगाव तालुक्यातील विळे ग्रामपंचायत हद्दीत भाऊची आळी विभागात गावठाण क्षेत्र बंदिस्त करून त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झाल्याप्रकरणी विळे गावचे ग्रामस्थ प्रफुल्ल घरटकर यांनी मागील वर्षी ८ डिसेंबर २०२० रोजी विळे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते.यावेळी माणगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी महेंद्र गायकवाड आणि विळे सरपंच गजानन मोहिते यांनी उपोषणकर्त्याना लेखी आश्वासन दिले होते की,आम्ही हा विषय मार्गी लावू.मात्र १ वर्ष पालटून देखील यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही.यामूळे प्रफुल्ल घरटकर यांनी येत्या १४ डिसेंबर रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.व उपोषणाने हा प्रश्न मार्गी लागणार नसेल तर १५ डिसेंबर रोजी प्रफुल्ल घरटकर हे आत्मदहन करतील असा इशारा देखील त्यांच्या कडून देण्यात आला आहे.
या संदर्भात प्रफुल्ल घरटकर यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले की,विळे भाऊची आळी येथील जे गावठाण होते ते परस्पर शासकीय दस्तऐवज करून हे गावठाण त्याला बंदिस्त करून ताब्यात घेण्यात आले आहे. ह्या जून महिन्यात मी स्वतः केलेल्या उपोषणाची दखल घेत आपण कोणत्या प्रकारची कारवाई केली? असे पत्र माझ्याकडून देण्यात आले आहे त्या पत्राचे देखील देण्यात आले नाही.मी मागणी पूर्ण झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असे देखील प्रफुल्ल घरटकर यांनी सांगितले आहे.

या विषयी आमचे प यांनी विळे ग्रामपंचायत सरपंच गजानन मोहिते यांना  सदर विषयावर प्रतिक्रिया मागीतली असता त्यांच्याकडून असे सांगण्यात आले की,काल ७ डिसेंबर रोजी ग्रामसभा घेण्यात आली आहे.तर ग्रामस्थांसमोर हा विषय आणण्यात आला होता तर तिथल्या स्थानिक लोकांचे म्हणणे असे आहे की आम्ही क्षेत्र मोजणी  करून देणार नाही.तश्याच प्रकारचे मोजणीची मागणी असणारे दोन अर्ज पेंडिंग आहेत.याकरिता आम्ही गटविकास अधिकारी माणगाव यांचे मार्गदर्शन मागितले आहे.उद्या ९ किंव्हा परवा १० डिसेंबर रोजी गटविकास अधिकारी जे मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करिता ग्रामपंचायत ची वाटचाल असेल.आम्ही हा विषय ग्रामसभेवर अवलंबून ठेवला होता  त्यापैकी ४ लोक बोलतात मोजणी करा व ५० लोक बोलतात मोजणी करू नका.उद्या जर वाद झाला तर जबाबदारी कुणाची ?अशी प्रतिक्रिया विळे सरपंच यांच्या कडून मिळाली आहे.