राम भोस्तेकर /माणगाव : येत्या २१ डिसेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या माणगांव नगरपंचायत करीता मतदान होत आहे.१७ नगरसेवकांची बॉडी असलेल्या या नगरपंचायत मध्ये ओबीसी आरक्षणावरील स्थगिती वगळता एकूण १३ जागांकरिता मतदान होणार आहे.यामध्ये अनेक राजकीय समीकरणे बदलताना दिसत असल्याचे मत माणगाव मधील राजकीय विश्लेषकांकडून वर्तविण्यात येत आहे.
अश्यातच मतदारांना गोंजारून गोंजारून जवळ केले जात आहे.यावरून आठवते की,लहान बालकांची जीभ वळण्याकरिता बालकांच्या माते कडून बोबडे बोल शिकवले जातात कसे? “इथे ईथे इथे नाच रे मोरा…मोर खाई चारा.. चारा खा पाणी पी आणि भुर्रर्र उडून जा… अश्याच प्रकारची स्थिती माणगांव मधून प्रभागां-प्रभागातुन दिसून येत आहे.तर अनेक चर्चाना उधाण असताना “ईथे ईथे इथे मत दे मला.. मटण खा ..दारू पी…मतदान कर…आणि लयाला जा…!” अशी खुमासदार चर्चा देखील माणगांव मधील नाक्या-नाक्यावर रंगलेली दिसून येत आहे.
मागील ५ वर्षाचा माणगांव नगरपंचायत कडून शहराचा केला गेलेल्या विकासाचा आलेख पाहता तो उतरताच आहे. शेवटचे दीड वर्ष सोडले तर शहरात झालेली विकासकामे नगण्य आहेत.त्यामुळे माणगांव शहरातील मतदार राजा यावेळी राजकिय पक्षांच्या भूलथापांना आणि अश्वासनांना बळी पडणार की माणगांव नगरपंचायत मध्ये परिवर्तन घडणार हे २२ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणी मधून पाहण्याचे औत्सुक्याचे ठरणार आहे.
माणगाव नगरपंचायत निवडणूक ! इथे इथे इथे मत दे मला….मटण खा.. दारू पी मतदान कर आणि लयाला जा…!
More from RaigadMore posts in Raigad »