पनवेल : पनवेल महापालिकेच्या निवडणूक विभागाच्यावतीने स्वीप अर्थात पध्दतशीर मतदार साक्षरता, नोंदणी आणि निवडणूक सहभाग मोहिम 2021 दिनांक 7 ऑक्टोबर पासून 30 ऑक्टोबरपर्यंत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत 150 हून अधिक मतदार नोंदणी शिबीरांचे आयेाजन करण्यात आले होते. यामध्ये 5500 हजाराहून अधिक नागरिकांनी मतदार नोंदणी केली. स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम, चर्चासत्र, सामाजिक संदेश देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध सोसायट्यांमधून 150 पेक्षा जास्त ठिकाणी एक दिवसीय मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. खारघर ,कामोठे, कळंबोली, पनवेल या चारही प्रभागामधून जवळपास 650 हौसिंग सोसायट्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये 35 सेवाभावी संस्था आणि सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
तसेच विजय पवार, विजय पाटकर, नूतन जैन, जयवंत वाडकर, प्रभाकर मोरे, मेघा घाडगे,अंकुर वाढवे, अनिकेत केळकर, उमेश ठाकूर, प्रणव रावराणे,तुषार साई सनी भूषण मुणगेकर अशा 12 मराठी मनोरंजन सृष्टीतील कलाकारांनी पालिका क्षेत्रातील नागरिकांनी मतदार नोंदणी करण्यासाठी व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले. याबरोबरच निवडणूक विभागाच्यावतीने ‘उत्कृष्ट जिंगल्स’ स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नरेश पाटील, मुकेश उपाध्याय, पंकज सूर्यवंशी, सुरज जले,विजयी झाले. या अंतर्गत सी.के.टी. महाविद्यालयाच्या निवडक विद्यार्थ्यांनी पनवेल महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाला नुकतीच भेट दिल. पद्धतशीर मतदार साक्षरता, निवडणुक आणि नोंदणी तसेच महापालिकेच्या कामकाजाबद्दल माहिती उपायुक्त श्री विठ्ठल डाके यांनी विषद केली.सदर कार्यक्रम राज्य निवडणूक विभागाच्या निर्देशानूसार आयुक्त मा. श्री. गणेश देशमुख यांच्या संकल्पनेतून साकार झाले. तसेच उपायुक्त मा. श्री विठ्ठल डाके, सहाय्यक आयुक्त मा. श्रीमती. सुवर्णा दखणे, निवडणूक विभाग प्रमुख सदाशिव कवठे तसेच सर्व प्रभाग अधिकारी यांनी विविध ठिकाणी उपस्थितीत राहून मतदार नोंदणी करण्यासाठी नागरिकांचा उत्साह वाढविला व सविस्तर मार्गदर्शन केले.