Press "Enter" to skip to content

संविधान दिनी महापालिका मुख्यालयात उद्देशिकेचे सामुहिक वाचन !

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले.

याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परवाना विभागाचे उप आयुक्त डॉ. श्रीराम पवार, समाजविकास विभाग उपआयुक्त संध्या अंबादे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, कार्यकारी अभियंता सुभाष सोनावणे, सुनिल लाड तसेच इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.
त्याचप्रमाणे यावेळी 26/11 च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले भारतीय जवान, पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच याप्रसंगी सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी माझी वसुंधरा अभियानाची सामुहिक शपथ ग्रहण केली.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »