पनवेल : राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष खारघर शहर महिला कमीटीने नवीन मतदार नाव नोंदनीचे दोन दिवसीय शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात सुमारे ४०० नागरिकांनी लाभ घेतला. राष्ट्रवादी महिला काँग्रेस खारघर शहर अध्यक्षा राजश्री कदम यांच्या पुढाकाराने सदर शिबीर संपन्न झाले.
खारघर शहर महिला अध्यक्ष राजश्री कदम यांना आनेक नागरिकांनी मागणी केली होती की नविन मतदान नोंदनी ,नावात बदल ,पत्ता चेंज करु पाहीजे. अनेक ठिकाणी आम्ही नावे नोंदवली पण यादीत नाव आले नाही, काही गोष्टी लक्षात आल्या की लोकसंख्येच्या तुलनेत मतदार संख्या फार कमी दिसत होती. म्हणून सदर शिबीर आयोजित केल्याची माहिती आयोजक राजश्री कदम यांनी दिली.दरम्यान, शिबिरात ४०० नागरीकांनी आपल्या नावाची नोंद केली आहे
यावेळी सर्व महिला पदाधिकारी सहभाग घेवुन हा यशस्वी उपक्रम केला , सुनंदा कुंभार ,रेखा भागवत , संगीता पवार ,सारीका शिरसागर सुनिता पेटकर मृणाल कदम विजया मोहीते , संगीता सुर्वे समाजसेविका पुष्पलता जाधव ,समाजसेविका सौ गोदावरी कातारे यांनी या उपक्रमाला सहकार्यकेले. राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल शहरजिल्हा उपाध्यक्ष सुरेश रांजवण, ओबीसी सेल पनवेल शहरजिल्हा अध्यक्ष विजय मयेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल शहर जिल्हा सरचिटणीस रामदास नारकर, मनोहर सत्रे, संभाजी मोहिते, गणेश शितोळे आदी उपस्थित होते.








