पनवेल : पनवेल महापालिकेच्या नव्याने बनविण्यात आलेल्या बजेटमध्ये पोलाद व्यावसायिकांना एलबीटीमध्ये सवलत देत ती माफ करण्यास समर्थन देण्याचा निर्णय घेवून पनवेल पालिका क्षेत्रातील नागरिकांच्या तोंडात मरण्यासारखा प्रकार पनवेल महानगरपालिकेच्या सत्ताधारी पक्षाने केला आहे. तसेच स्थायी समिती सभेमध्ये विरोधी पक्षातील नगरसेवकांनी रहिवासीयांवर लादण्यात येणाऱ्या करात जमा खर्चात दर्शविलेली संख्या आणखीन ४० टक्के कमी करण्याची मागणी केली होती. नागरिकांवर लादण्यात आलेल्या करात ३०% सूट पालिकेने दिली आहे परंतु विरोधी पक्षातील नगरसेवकांनी ही सूट ७०% करण्याची सातत्याने मागणी करत आहेत. परंतु सर्वसाधारण सभेत ही संख्या कमी न केल्यामुळे या बजेटविरोधात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी एकत्र येवून महासभेच्या मनमानी कामकाजावर बहिष्कार टाकून सभात्याग केला.
नागरिकांना दिलासा देणाऱ्या मालमत्ता कराबाबत पनवेल महानगरपालिका सत्ताधारी उदासीनता दाखवित असल्यामुळे अखेर महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी सभात्याग करून याबाबत पत्रकार परिषदेत सत्ताधारी पक्षाचे मनमानी धोरण कसे चालले आहे, याबाबत खंत व्यक्त केली. एका बाजूला मालमत्ता करासाठी नागरीक रस्त्यावर उतरत आहेत तर दुसऱ्या बाजूला नागरिकांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवित व्यावसायिकांना एलबीटी माफ करण्याचा घाट पलिकेमार्फत घालण्यात आला. मात्र यापुढे नागरिकांसाठी आम्ही महाविकास आघाडीचे नगरसेवक रस्त्यावर उतरून मालमत्ता कर ७० टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी तसेच कोरोना काळातील मालमत्ता कर माफ करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून यासाठी लवकरच पालिका सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा निषेध नोंदविणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आयोजित पत्रकार परिषदेला पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस तथा नगरसेवक गणेश कडू, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सतीश पाटील, नगरसेवक रविंद्र भगत, नगरसेविका सुरेखा मोहोकर, नगरसेविका प्रीती जॉर्ज, नगरसेविका सारिका भगत आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत मालमत्ता कर हा विषय जरी अजेंड्यावर असला तरी या अनुषंगाने गेली कित्येक वर्षे पालिका हद्दीतील रखडेलेली विकास कामे, रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचार आदी विषयांवर मोठ्या प्रमाणावर वक्तव्य करण्यात आली.
पनवेल महानगर पालिकेतील भाजप सत्ताधारी आणि त्यांचे प्रशासन हे पनवेलच्या नागरिकांच्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत शेठजींच्या एलबीटीचे 200 कोटी माफ करताय, परंतु माझ्या गोरगरीब जनतेचा कर माफ करता येत नाही का, जनतेच्या विरोधामध्ये भूमिका घेणाऱ्या प्रत्येक सदस्याचा येत्या निवडणुकीत जनता शाल जोड्याने स्वागत केल्याशिवाय राहणार नाही.-विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे, पनवेल महानगरपालिका

पालिकेला एलबिटी माफ करण्याचे समर्थन जमते मात्र मालमत्ता कराबाबत नाही, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक ! वनक्षेत्रात आग लावणे किंवा वणवे लावण्याला पूर्णपणे आळा घालणार; कठोर उपाययोजना करणार – वने मंत्री गणेश नाईक !
- मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि ‘रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण’ स्थापन करा!जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
- वलप ग्रामपंचायतीतील २६६० बनावट जन्मनोंदी प्रकरणी ३ आरोपी अटकेत – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती
- मोदींच्या १२ वर्षांत भारताचा सर्वांगीण विकास; पंतप्रधान मोदी देशासाठी वरदान – आमदार संजय केळकर
More from RaigadMore posts in Raigad »







