Press "Enter" to skip to content

गवत कापणीसाठी खारघरसाठी ३ मशीन उपलब्ध ! नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांच्या पाठपुराव्याला यश !

पनवेल : पावसाळ्यात उद्यान, गार्डन आणि सार्वजनिक ठिकाणी वाढलेले गवत कापण्यासाठी आता खारघरसाठी ३ इलेक्ट्रिक मशिन्स पनवेल महानगरपालिकेने उपलब्ध करून दिल्या आहेत. नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय यांनी यासाठी पनवेल मनपा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
गेल्या काही महिन्यांपासून पनवेल महानगरपालिकेकडे नव्याने हस्तांतर झालेल्या प्ले ग्राउंड व उद्यानांमध्ये पावसाळ्यात वाढलेल्या गवत व छोटे झाडेझुडपे मशीन उपलब्ध नसल्यामुळे सफाई कर्मचारी हाताच्या साहाय्याने कापत असल्याने अधिक वेळ तसेच साप व इतर वन प्रानी सुद्धा निर्दशनास आले होते. त्यामुळे नगरसेविका हर्षदा उपाध्याय आणि युवानेते अमर उपाध्याय यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे मशिनची मागणी करताच होंडा कंपनीच्या चांगल्या दर्जाच्या ३ मशीन पनवेल महानगरपालिका, प्रभाग अ कार्यालय , खारघर, येथे उपलब्ध झाल्या आहेत.

नगरसेविका हर्षदा उपाध्याय