Press "Enter" to skip to content

केंद्रीय मंत्री कपिल पाटील शुक्रवारी मोहोपाड्यात पाणी परिषदेला करणार मार्गदर्शन !

पनवेल : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल हर घर जल’ या मोहिमे अंतर्गत शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०५ वाजता मोहोपाडा मैदानावर केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीतीत पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यास प्रमुख मान्यवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार देवेंद्र साटम, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, खालापूर तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे, उरण तालुका अध्यक्ष रवि भोईर, उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, उपस्थित राहणार आहेत.
वासांबे, पुनाडे आठगाव पूर्व विभाग आणि चाणजे या परिसरातील गावांकरिता पाण्याची दीर्घकालीन पाणी योजना राबविण्याच्या दृष्टिकोनातून या पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी केले आहे.