पनवेल : काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.मुंबई येथील प्रदेश कार्यालयात संपन्न झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत, खासदार सुनिल तटकरे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सूरदास गोवारी,पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश पाटील, कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, कळंबोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक विजय खानावकर, महिला सेल कार्याध्यक्षा अमिता चौहान, दर्शन ठाकूर, पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष अजिनाथ सावंत,पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश रांजवन,खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके,ओबीसी नेते विजय मयेकर,सलमान पटेल, पनवेल युवक कार्याध्यक्ष शहाबाज पटेल, कामोठे शहर कार्याध्यक्ष किशोर मुंडेयांच्या सह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुदाम पाटील यांच्यासमवेत काँग्रेस पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी देखील पक्षप्रवेश केला. यामध्ये ताहीर पटेल जिल्हा उपाध्यक्ष, सेवादल जिल्हाध्यक्ष महिला सेल सुदेशना रायते,अमित लोखंडे जिल्हाध्यक्ष मजदूर सेल,विनीत कांडपिळे जिल्हा अध्यक्ष ट्रान्सपोर्ट सेल, महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेविका शशिकला सिंग,नरेश कुमारी मेहमी,जयश्री खटकले महिला कळंबोली ब्लॉक अध्यक्ष,विर सिंग यांचा समावेश आहे.