अलिबाग : रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना “नवभारत गव्हर्नन्स अवॉर्ड-2021” ने दि.20 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांना त्यांनी प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख व पारदर्शक पद्धतीने नवनवीन उपक्रम राबवून उत्तम सेवा बजावल्याने सन्मानित करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी आपल्या आतापर्यंतच्या संपूर्ण प्रशासकीय सेवेत मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, सहसचिव, कामगार आयुक्त आणि जिल्हाधिकारी अशा विविध पदांवर अत्यंत उल्लेखनीय प्रशासकीय कामगिरी केली आहे.
आता रायगड जिल्ह्यासाठीही ते विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सर्व शासकीय विभागांना, स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून रायगडच्या प्रशासनाला गती देण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. विविध कर्ज मेळावे, माझी वसुंधरा अभियान, कातकरी उत्थान अभियान, शासकीय कार्यालयांचे बळकटीकरण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे, पर्यटन विकास, विविध शासकीय विभागांना एकत्र घेऊन जनतेला वेगवेगळ्या योजनांचा एकत्रित लाभ देण्यासाठी महामेळावे, शिबिरांचे आयोजन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून रायगडकरांची सेवा करण्याचा संकल्प डॉ.कल्याणकर यांनी केला आहे.
तसेच जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी हा सन्मान, हे यश माझे वैयक्तिक नसून आतापर्यंत मला साथ दिलेल्या सर्व अधिकारी-कर्मचारी सहकाऱ्यांचे आहे. हे वैयक्तिक नसून सांघिक यश आहे.
राजभवन येथे राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते संपन्न झालेला जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचा सन्मान ही बाब संपूर्ण रायगडवासियांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर “नवभारत गव्हर्नर अवॉर्ड-2021” ने सन्मानित !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
More from RaigadMore posts in Raigad »