Press "Enter" to skip to content

जनतेसाठी सदैव धावणारा जनसेवक : रणजित नाईक !

जनतेसाठी २४ तास कधीही धावून जाणारा सच्चा युवा नेता म्हणून आपली छाप जनतेच्या मनात निर्माण करणारा नवी मुंबईतील सिवुड्स -दारावे-नेरुळ विभागातील भाजपचे धडाडीचे नेतृत्व म्हणजे रणजित नाईक होय. नवी मुंबईच्या राजकारणात धडाकेबाज एंट्री करून आपल्या कर्तृत्वाची छाप पाडणारे नवी मुंबई भाजपचे युवा नेतृत्व म्हणजे दारावे गावाचे भूमिपुत्र रणजित नाईक होय. रणजित नाईक हे लोकनेते गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक आहेत. नवी मुंबईत महानगरपालिकेच्या सिवुड्स- दारावे, नेरुळ विभागात रणजित नाईक यांचे मोठे कार्य आहे.

रणजित नाईक नवी मुंबई भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत. आपल्या कार्य कर्तृत्वाने जनतेच्या मनात त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नेरुळ विभागात आणि विशेषतः सिवूडस-दारावे प्रभाग क्रमांक ९२ आणि ९९ मध्ये रणजित नाईक यांचे उत्तम कार्य आहे. सिवूडस-दारावे विभागात आमचा नेता अशी प्रतिमा जनतेच्या मनात त्यांनी निर्माण केलीय. दारावे गावातील ग्रामस्थांनी देखील रणजित नाईक यांच्या नेतृत्वाचे स्वागत केले आहे. सिवूडस -दारावे विभागातील नागरी प्रश्नांची रणजित नाईक यांना चांगली जाण आहे. रस्ते, पदपथ, गटारे, दिवाबत्तीची सोय, साफसफाई, आदी विविध नागरिकामांसाठी रणजित नाईक यांनी सदैव प्राथमिकतेने काय केले आहे. त्यांच्या कार्यात सातत्य आहे. कोणत्याही परिस्थितीत लोकांची कामे झाली पाहिजेत, अशी त्यांची नेहमी भूमिका असते. आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर राबवून आपले सामाजिक दायित्व रणजित नाईक यांनी निभावले आहे.

आपला नेता कसा आहे याची खरी जाण लोकांना संकटाच्या काळात होते. कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रणजित नाईक यांनी रस्त्यावर उतरून लोकांची सेवा केली. लोकांच्या मदतीला धावून गेले. अन्नधान्य, जेवण, हॅन्ड वॉश, सनीटाईझर, मास्क वाटप करून मानवी मूल्याची जपणूक केली. अनेकांना आर्थिक मदत केली. आपल्या विभागातील नागरिकांना वैदयकीय सुविधा मिळावी,म्हणून सदैव धावून गेले. एक खंबीर नेतृत्व उभे राहायला त्या व्यक्तीकडे जिद्द,धडपड, चिकाटी, आणि संयम लागतो. रणजित नाईक हे लोकनेते गणेश नाईक यांच्या तालमीत तयार झाल्याने लोकांचे नेतृत्व करायला ते खऱ्या अर्थाने तयार आहेत.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »