Press "Enter" to skip to content

देशातील तमाम नागरिकांनी ७५ व्या स्वातंत्र्यदिनी भांडवलवादी आणि ब्राह्मण्यवादी व्यवस्थेला नाकारावे ! डॉ. जी. के. डोंगरगावकर !

पनवेल : भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव राहुल शिक्षण प्रसारक मंडळाच्या सत्याग्रह महावियालयाच्या वतीने सुप्परक भवन से. १९ खारघर नवी मुंबई येथे संपन्न झाला. कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करून मोठया उत्साहात विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले . वेश-भुषा, वक्तृत्व स्पर्धा ऑनलाइन घेण्यात आली , सकाळी ७ वाजता संस्थेच्या प्रांगणात राष्ट्रध्वजारोहण डॉ. जी के डोंगरगावकर यांनी केले.

स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतलेल्या स्वतंत्र सैनिकांना अभिवादन करण्यात आले. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन सामुहिक करण्यात करण्यात आले . सत्याग्रह महाविद्यालय, सिद्धार्थ मलि्टपरज रेसिडेंन्शल हायस्कुल मधील प्रा. वनिता सूर्यवंशी , प्रा एलोरा मित्रा , प्रा नेहा राणे यांनी अमृत महोत्सवी स्वात्रंत्र्याची हिशोब तपासणी यावर आपले मार्मिक विचार मांडले .

१९४७ नंतर जन्म घेतलेले २० टक्के भारतीय शिक्षण पासून वंचित आहेत. देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. संविधानाच्या स्वप्नातील शुन्याकडून शिखराकडे जात असताना धर्म, वंश, जात, वर्ग, पंथ, भाषा, रूढीच्या आधारे भेदभाव संविधानातील उद्धेशाला आडकाठी आहेत. कायद्याने समता देशात रुजली मात्र सर्वांना संधी विकासात नाही असे या वक्त्याने आपले मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी वक्त्यांचा धागा पकडत ७५ व्या स्वातंत्र्यदिनी कोणत्या क्षेत्रात भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे याचा आढावा घेतला . डोंगरगावकर म्हणाले राजकारणात प्राध्यापक, शिक्षक , वकील , प्रत्रकारानी सक्रिय होणे काळाची गरज आहे . स्वातंत्र्याच्या संग्रामात मोठ्या प्रमाणात बुद्धिजीवी शामिल होते त्यात बॅरिस्टर महात्मा गांधी , पंडित जवाहरलाल नेहरू , वल्लभाई पटेल यासारखे शिक्षण तज्ञ होते . सामाजिक स्वातंत्र्याच्या राजकीय लढ्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणून सकल समाजाच्या उच्च शिक्षितांनी राजकारणात येणे आवश्यक आहे. पुढे ते म्हणाले स्वातंत्यापूर्वीच पुंजीवाद आणि ब्राह्मण्यवाद देशातील सर्वाधर्मीय जाती जमातीत रुजला आहे .

केवळ ब्राह्मण , बनिया समाजात ब्राह्मण्यवाद रुजला आहे हे सर्वस्वी खरे नाही. भारतातील सर्व जातीजमातीतील ब्राह्मण्यवादाचे उच्चाटन करणे देशातील केवळ राजकारण्यांचे काम नसून तमाम नागरिकांनी भांडवलवादी आणि ब्राह्मण्यवादी व्यवस्थेला नाकारण्याची वैभाशाली भारतासाठी आवश्यक आहे. संविधान सुसंगत वर्तन ठेवून नागरिकांनी आत्मनिर्भर भारत उभा करण्याची शपथ घेतली पाहिजे. तळोजा प्रभागातील नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील यांना अमरचंद हाडोलतिकार यांनी भारताचे संविधान आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन सुजाता भोसले यांनी केले. पिपल्स एम्पॉवरमेंट सोसाटीचे सरचिटणीस प्रा हर्षल शाक्य यांनी उपस्थितांना फळे अल्पोपहार यांचे वाटप केले. कोरोना महामारीत आरोग्य सेवेत कार्य केलेल्या डॉ कपिल चावरे, डॉ सुभांशु भालाधरे, डॉ प्रज्ञा डोंगरगावकर, डॉ प्रणिता डोंगरगावकर तसेच लॉकडाउनच्या काळात गरीब आणि गरजूना धान्य, जीवनावश्यक वस्तू, दान देणाऱ्या शाळेतील शिक्षिका सुजाता भोसले, सुंदर वसावे, एम. एल. सूर्यवंशी, गोविंद बनसोडे यांचा पुष्पगुच्छ देऊन नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली असे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

डॉ जी के डोंगरगावकर
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »