- बलात्कारी टी सिरीज मालक भूषण कुमार यास
तातडीने अटक करून पीडित मुलीला न्याय द्या !
- राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष
मल्लिकार्जुन पुजारी यांची मागणी !
मुंबई : बलात्कार प्रकरणातील आरोपी टी सिरीज मालक भूषण कुमार हा बिनधास्त मोकाट फिरत आहे. मात्र, ज्या मुलीवर भूषण कुमारने अत्याचार केला , त्या पीडित मुलीच्या न्यायासाठी पुढे आलो म्हणून राजकीय दबाव वापरून माझ्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. महाविकास आघाडीच्या कारकिर्दीत हा कोणता न्याय ? असा सवाल राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी यांनी मुंबई येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
बलात्कारी टी सिरीज मालक भूषण कुमार यास तातडीने अटक करून पीडित मुलीला न्याय द्यावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असल्याचे श्री. पुजारी यांनी यावेळी सांगितले. भूषण कुमार याच्यावर १४ जुलै रोजी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर डी एन नगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी हिला अभिनयाची आवड आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये ती कलाकार आहे. २०१७ मध्ये सदर मुलगी मित्र-मैत्रिणींसोबत जे डब्लू मॅरियट जुहू तारा रोड संताक्रुज मुंबई येथे कामानिमित्ताने गेली होती. तेव्हा तिचा मित्र अलोक कुंदन याच्या माध्यमातून टी सीरिजचे मालक भूषणकुमार यांची भेट झाली. तिने कामासाठी विनंती केली तेव्हा भूषणकुमार यांनी तिला त्यांचा मोबाइल नंबर दिला. व संपर्क करण्यास सांगितले. २९ सप्टेंबर २०१७ रोजी भूषण कुमार यांना तिने संपर्क केला. त्याने पीडित मुलीला फोटो पाठवायला सांगितले. थेट मोबाईलवर फोन न करता मोबाईलमध्ये टेली ग्रामअँप डाउनलोड करून त्याद्वारे संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये संभाषण सुरु झाले. १४ ऑक्टोबर २०१७ रोजी भूषणकुमार यांने अंधेरी येथील २२ अलमार्ट बंगल्यावर बोलावले. मात्र, तिने बंगल्यावर येण्यास नकार दिला. मात्र, कामाबाबत ऑफिसमध्ये सर्वांसमोर सविस्तर बोलता येणार नाही, असे सांगून तिला बाहेर भेटायला बोलावले. कामासाठी आपण बसून बोलू असे सांगून त्याने मुलीला बंगल्यावर नेले. फिल्म इंडस्ट्रीजमध्ये काम करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवावे लागतील,अशी मागणी भूषण कामाने केली. मात्र, मुलीने नकार देत तिथून निघण्याचा प्रयत्न केला. मात्र, भूषणकुमारने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नव्हे त्याने बलात्काराची शूटिंग करून तिला ब्लॅक मेल करीत वारंवार अत्याचार केले. सततच्या अत्याचाराला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिचा सहकारी उज्ज्वल सिंग याच्या लक्षात आल्यानंतर त्याने तिला समजावले, म्हणून सदर मुलीचा जीव वाचल्याचे श्री पुजारी म्हणाले.
उज्ज्वल सिंग सदर मुलीला माझ्याकडे घेऊन आला. पीडित मुलीने सर्व पुरावे मला दाखविले. तेव्हा मी भूषणकुमारला ३० जून २०२१ रोजी याबाबत विचारणा केली. तेव्हा संध्याकाळ पर्यंत कॉल करतो असे सांगून फोन ठेवला. मात्र, त्याने पुन्हा फोन केला नाही. २ जुलै २०२१ रोजी दुपारी सव्वातीन वाजता भूषणकुमारचा काका किशन कुमार याने व्हाट्सअँप कॉल केला. ५ जुलै २०२१ रोजी वाशी येथील तुंगा हॉटेलला भेटायला आला. भूषणकुमार व किशनकुमार यांच्यात झालेल्या संवादात मी कुठेही पैशाची मागणी केलेली नाही. असे असताना भूषणकुमार याने माझ्याविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याची खोटी तक्रार केली. १४ जुलै रोजी पीडित मुलीने डी एन नगर पोलीस ठाण्यात भूषण कुमार यांच्याविरोधात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, बलात्कारी आरोपीला अटक करण्याऐवजी पीडित मुलीला न्यायदेण्यासाठी पुढे आलेल्या माझ्याविरोधात गुन्हा दाखल होतो, हा कोणता न्याय असा सवाल श्री पुजारी यांनी पत्रकार परिषदेत केला.
१ जुलै रोजी जर भूषणकुमारने माझी तक्रार केली तर ५ जुलैला मला भेटायला का आला ? पोलिसांनी मला चौकशीसाठी का बोलावले नाही. मात्र, १४ जुलै रोजी जेव्हा भूषणकुमारवर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर दबाबतंत्र वापरून माझ्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पुजारी यांनी पत्रकारांना सांगितले. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आहे. भूषण कुमार व किशन कुमार यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना फोन करून मी त्यांना ब्लॅक मेल केल्याची खोटी तक्रार केली. सदर प्रकरणाची सर्व माहिती जितेंद्र आव्हाड यांना मी पुराव्यानिशी दिली. मात्र त्याची सत्यता न पडताळता मला पक्षाचा पदाचा राजीनामा देण्यास सांगितले. राजीनामा देण्यास मी नकार दिल्यानंतर त्यांनी मला कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता पदावरून काढून टाकले. एका पीडित मुलीला न्याय देण्याच्या भूमिकेत असताना जितेंद्र आव्हाड यांनी मुलींबाबत अयोग्य शब्द वापरून भूषणकुमार टी सिरींजचा मालक आहे, त्यामुळे या प्रकरणातून मागे होण्यास सांगितले. या प्रकरणातून मी मागे हटलो नाही म्हणून माझ्यावर बेकायदा गुन्हा दखल केला, असा खळबळजनक आरोप पुजारी यांनी पत्रकार परिषदे केला आहे. जो पर्यंत भूषणकुमारला अटक होत नाही, तो पर्यंत मुंबई आझाद मैदानावर साखळी उपोषण करण्याचा इशारा देखील मल्लिकार्जुन पुजारी यांनी यावेळी दिला.





