पनवेल : झाडे नष्ट झाल्यामुळे ग्लोबल वाॅर्मिंगच्या समस्येने विक्राळ रूप धारण केले आहे. वृक्षाचे संगोपन आणि संवर्धन न केल्यास सगळीकडे हाहाकार उडेल व मनुष्यासोबतच पृथ्वीवरील सगळया जीवजंतुंचे अस्तित्वच धोक्यात येईल. हे होऊ नये यासाठी जास्तीत जास्त झाडे लावायला हवीत. या प्रेरणेतुन सोमवार ९ ऑगस्ट रोजी मुर्बीगांव येथील श्री.गांवदेव मंदिर येथे वृक्षारोपण करण्यlत आले . त्याप्रसंगी मोठया संखेने तरुण वर्ग, लोकप्रतिनिधी, विवीध पक्षाचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि निसर्ग प्रेमींउपस्थित होते. महत्वपूर्ण बाब म्हणजे प्रत्येकजण आपले स्वत:चे एक झाड घेवुन आले आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वतः घेतली आहे. ग्रामस्थ मंडळ मुर्बी यांनी सदर उपक्रमाला प्रोत्साहन दिले.

माझे झाड , माझी जबाबदारी ! ग्रामस्थ मंडळ मुर्बी यांच्यावतीने वृक्षारोपण !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




