नवी मुंबई : ७५ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ग्लोबल ताज इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल अवार्ड विजेत्या तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉ वर्षा चौरे यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय ऑनलाइन गीतगायन, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
सदर स्पर्धा वेगवेगळ्या गटात संपन्न होणार आहे. ० ते १० वर्षे वयोगटातील मुलांना देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत सहभागी होता होणार आहे. ११ ते २० वर्षे वयोगटातील मुलांना माझा आदर्श महापुरुष आणि स्वतंत्र भारत या विषयावर वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. त्यांच्यासाठी ३ ते ५ मिनिटे वेळ देण्यात आली आहे.खुल्या गटासाठी खुला गट स्वतंत्र भारताची आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था सक्षम आहे की नाही? हा विषय वक्तुत्व स्पर्धेसाठी ठेवण्यात आला आहे. त्यासाठी ५ ते ७ मिनिटे वेळ देण्यात आला आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार असून विजेत्या स्पर्धकांना पारितोषक दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकास १००० किमतीची पुस्तके, द्वितीय क्रमांकास ७०० किमतीची पुस्तके तर तृतीय क्रमांक विजेत्यास ५०० किमतीची पुस्तके देण्यात येणार आहेत.
इच्छुक स्पर्धकांनी १४ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेपर्यंत ८४२४८६७०७० या नंबर वर कॉल व एसएमएस करून आपली नवनोंदनी करावी, असे आवाहन डॉ वर्षा चौरे यांनी केले आहे. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपल्या गाण्याचा अथवा भाषणाचा व्हिडिओ ८४२४८६७०७० या नंबर वर व्हाट्स अँप करावा. १६ ऑगस्ट रोजी रोजी स्पर्धकांचे व्हिडिओ अपलोड केले जातील व स्पर्धकांना त्यांच्या व्हिडिओची लिंक शेअर केली जाईल. भाषेचा दर्जा, हावभाव, वेळ यावरून विजेते नंबर काढले जातील. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे निमित्त सायंकाळी ७:३० वाजता ऑनलाइन कार्यक्रम घेवून निकाल घोषित करण्यात येईल. पुढील १५ दिवसात सर्वांना प्रमाणपत्र आणि पारितोषिक घरपोहच मिळेल, असे डॉ वर्षा यांनी एका प्रसिद्ध पत्रकाराद्वारे कळविले आहे.





