Press "Enter" to skip to content

फणसवाडी, चाफेवाडी, हैदरवाडीमध्ये मिळणार घरपोच पाणी ! नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांच्या प्रयत्नांना यश !

भविष्यात आणखी प्रश्न मार्गी लावू – अमर उपाध्याय !

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर विभागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना घरपोच पिण्याचे पाणी देण्यास स्थानिक नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय यांना अखेर यश आले आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांना नळ जोडणीची हि भेट हर्षदा उपाध्याय यांनी दिली आहे. यासाठी लागणाऱ्या पाईप लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ महापौर डॉ कविता चौतमल आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

पिण्याचे पाणी आपल्या घरात मिळण्यासाठी खारघरमधील आदिवासी बांधवाना सुमारे ७५ वर्ष प्रतीक्षा करावी लागली आहे. खारघर विभागातील फणसवाडी, चाफेवाडी, हैदरवाडीमध्ये आदिवासी कुटुंबे राहतात. स्वातंत्र काळापासून नागरी मूलभूत सुविधा मिळण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरु आहे. पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना अपार यातना सोसाव्या लागत होत्या. काही किलोमीटर अंतरावर असलेल्या बोअरवेलमधून पाणी ओढून महिलांना डोक्यावर हांडे घेऊन पाणी घरी यावे लागत होते.त्यामुळे मोठी गैरसोय होत होती. आदिवासी बांधवांची पाण्यासाठी होणारी गैरसोय आणि आदिवासी भगिनींना पाणी घरापर्यंत आणण्यासाठी होणाऱ्या वेदना नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी पहिल्या. तात्कळ पनवेल महानगरपालिका प्रशासनाला सांगून, त्यासाठी पाठपुरावा केला. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तात्काळ दखल घेऊन सदर काम मार्गी लावून घेतले. बोअरवेल पासून आदिवासी वाड्यांपर्यंत पाईप लाईन टाकून तिथे पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून फणसवाडी, चाफेवाडी, हैदरवाडी येथे नळजोडणी देऊन घरपोच पाणी देण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सदर कामाचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने करण्यात आला.यावेळी सभापती अनिता पाटील, नगरसेवक रामजी बेरा नगरसेवक प्रवीण पाटील, वासुदेव पाटील सुद्धा उपस्थित होते.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »