Press "Enter" to skip to content

पूरग्रस्तनांसाठी मदतीचा हात ! रणजित नाईक यांचा पुढाकार !

नवी मुंबई : माझी जबाबदारी, माझे कर्तव्य या सामाजिक भावनेतून भारतीय जनता पार्टी युवा मोर्च्याचे नवी मुंबई सरचिटणीस यांनी कोकणातील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हात पुढे करीत जीवनावश्यक वस्तुंनी भरलेला टेंपो आज रवाना केला.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण परिसरात सर्वच ठिकाणाहून मदतीचा ओघ सुरु आहे. ग्रामीण भागात, खेडे गावात व शहरी भागात देखील मोठ्याप्रमाणात पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
आपले कर्तव्य म्हणून आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रणजित नाईक यांनी नवी मुंबई येथून मदत पाठविली आहे. चिपळूण येथील गरजूंना समाजसेवक रणजित नाईक, ऊत्कर्ष मित्र मंडळ, रिक्षा चालक व स्थानिक रहिवाशी यांच्या तर्फे मदत पोचवण्यात येणार आहे.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »