पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खारघर आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तूंनी भरलेला टेम्पो पाठविण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस भावनाताई घाणेकर, पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य बी.ए. पाटिल,उपाध्यक्ष आर.एन. यादव व पनवेल शहर जिल्हा सरचिटणीस रामदासभाई नारकर यांच्या उपस्थितीत खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके व राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष राजश्री कदम यांच्या पुढाकाराने खारघर शाहरातून पूरग्रस्त कुटुंबांना दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या वस्तु रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या महाड़ येथे मदत केंद्रावर पाठविण्यात आल्या.
युवकांच्या माध्यमातून पनवेल शहर जिल्हा युवक कार्याध्यक्ष शहबाज़ पटेल व खारघरचे युवक कार्यकर्ते राहुल पाटिल,तसेच महिला समाज सेविका कल्पना खरे, वृषाली शेडगे, अरुणा शर्मा, अलका कदम, चित्रा देशमुख यांचे सहकार्य लाभले. यावेळी राजश्री कदम, पुष्पलता जाधव ,चित्रा देशमुख,सारिका शिरसागर,सुनंदा कुंभार,आनिता दाभट,संगीता सुर्वे,रेखा भागवत,आलका जाधव,संगीता पवार,कांचनताई शितोळे,विजया मोहीते,नयन वारे,संगीता सर्वे,सुनिता पेटकर,मृणाल कदम,आरुना शर्मा,रेनुका पगारे आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. राजु आचलकर, सोनू सूर्यवंशी,गणेश देशमुख, वीरसिंह कदम,शंकर जाधव, राकेश शिंदे इत्यादि पदाधिकारी उपस्थित होते.






