नवी मुंबई : अतिवृष्टीमुळे कोकणात निर्माण झालेल्या पुरसदृश्य परिस्थितीमुळे मोठे संकट कोसळले. या संकटात अनेक जीव गेले, अनेक संसार उध्वस्त झाले.
अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त झालेल्या कोकणातील कुटुंबांना मदतीचा हात म्हणून नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मदतीचा ओघ कायम सुरू आहे. आज पुन्हा जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले २४ टन सामानाचे २ ट्रक पाठविण्यात आले.
आज शनिवार दिनांक ३१ जुलै रोजी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी सदर ट्रकना हिरवा कंदील दाखवून कोकणच्या दिशेने रवाना करण्यात आले. यावेळी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आनंद परांजपे, नगरसेवक संदीप सुतार, नगरसेविका स्वप्ना गावडे, नगरसेविका सलुजा सुतार,भोजमल पाटील, सौरभ काळे, संतोष आहेर, रवी ढोबळे, श्री कालेकर, सतनाम सिंग , विजया कदम तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मागील आठवड्यात नवी मुंबई राष्ट्रवादीच्या वतीने सुरवातीला ८० टन सामना पाठविण्यात आले होते. त्यापाठोपाठ पुन्हा ६० टन सामान भरलेले ३ ट्रक रवाना करण्यात आले होते. मदतीचा ओघ कायम ठेवत कोकणातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आज पुन्हा ३ ट्रक जीवनावश्यक सामान पाठविण्यात आले.

कोकणातील पूरग्रस्तांसाठी नवी मुंबई राष्ट्रवादीकडून मदकार्य सुरुच !जीवनावश्यक वस्तूंचे आणखी २ ट्रक सामान कोकणाकडे रवाना !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




