Press "Enter" to skip to content

जलप्रलयाच्या मदतकार्यात काही कमी पडू नये : आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश !

नवी मुंबई : अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांना जलप्रलयाचा प्रचंड तडाखा बसलेला असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनानुसार सर्व स्तरांतून मदतकार्य केले जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनेही यामध्ये पुढाकार घेत २ मदतकार्य पथके ६५ अधिकारी, स्वयंसेवकांसह महाडकडे तसेच १ वैद्यकीय पथक चिपळूणकडे आवश्यक साधनसामुग्रीसह तातडीने रवाना केली आहेत. या मदतकार्याबाबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी विशेष बैठक घेत सविस्तर आढावा घेतला आणि तेथील शासकीय अधिका-यांच्या नियमित संपर्कात राहून आवश्यक मदतकार्य करणेबाबत संबंधितांस निर्देश दिले.

  याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी   निलेश नलावडे उपस्थित होते.      
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »