Press "Enter" to skip to content

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे यावे : अशोक गावडे यांचे नवी मुंबईकरांना आवाहन !

नवी मुंबई : एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असे म्हणत राज्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी नवी मुंबईकरांना केले आहे.

२०१९ सालाप्रमाणे यंदाही अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन महाराष्ट्रात जलमय ( पुरग्रस्थ ) परिस्थिती उद्भवली आहे. शेकडो लोकं मृत्युमूखी पडले आहेत. हजारो परिवारांचे संसार उघड्यावर आले आहेत. अशा प्रकारचे फार मोठं गंभीर संकट आज महाराष्ट्रासमोर उभे ठाकलेलं आहे. अशा कठीण प्रसंगी एक भारतीय म्हणुन आपली स्वतःची जवाबदारी पार पाडण्याची ही वेळ आलेली आहे, अश्याच प्रामाणिक उद्देशाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार अशोक अंकुशराव गावडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व नगरसेविका स्वप्नाताई मंगेश गायकवाड (गावडे) राष्ट्रवादी काँग्रेस नवी मुंबई जिल्हा मंगळवार यांच्या पुढाकारातून २७ जुलै रोजी जीवनावश्यक साहित्य मदतीच्या स्वरूपात चिपळुण, खेड, महाड, सांगली व कोल्हापूर येथील आपल्या पूरग्रस्त बांधवांना पाठविण्यात येणार आहे.
महापूर आलेल्या भागातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी नवी मुंबईकरांनी तसेच राष्ट्रवादी पक्षातील सदस्यांनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन अशोक गावडे यांनी केले आहे. मंगळवार दिनांक २७ जुलैच्या आधी पीठ / तांदुळ / तेलाची बॅग / मीठ / अंघोळीच्या- कपड्याचे साबण / कोलगेट / तेल सॅनिटरी नॅपकिन / सुखे खाद्य पदार्थ जसे फरसाण, बिस्कीट / ब्लॅंकेट, चटई, टॉवेल, मेणबत्ती/ पाण्याची बाटली/ सॅनिटायझर / मास्क / ब्रश / ब्लॅकेट / माचीस / फिनाईल ईत्यादी साहित्य आपण आपल्या बांधवांसाठी मदत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेरुळ, से. २८, कार्यालयात जमा करून आपल्या पुरग्रस्थ बांधवांसाठी मोलाची मदत करावी, असे आवाहन अशोक गावडे यांनी केले आहे.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »