Press "Enter" to skip to content

बुद्ध वचन त्रिपिटक अखंड पारायण सत्याग्रह महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम !

नवी मुंबई : नवी मुंबई येथे वर्षावास समारंभाचे आयोजन राहुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संविधान पाठशाळा आणि सत्याग्रह महाविद्यालय यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे आणि विशेष अतिथी म्हणून संजय हिंगमिरे अभियंता पनवेल महानगरपालिका हे उपस्थित होते. भगवान बुद्ध बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पाहुण्यांनी पुष्प अर्पण करून व दीप प्रज्वलित केले.
पुज्य भंते पूर्ण यांनी सर्व उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. . संविधान पाठ शाळेच्या संचालिका रत्नमला डोंगरगावकर यांनी उपक्रमाची माहिती आणि पाहुण्यांचे पुष्पगुच्छ, भारताचे संविधान, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची माईलस्टोन भाषणे, डेड ला‌ॅक ऑफ बुद्धिस्ट सेन्सस आणि बुद्ध रूप देऊन पाहुण्यांचे सन्मान केला.
संजय हिंगमिरे अभियंता पनवेल महानगरपालिका यांनी भगवान बुद्धांची विपश्यना आणि त्यांची सर्व मानवाला उपयोगिता यावर आपले मौलिक विचार मांडले. विपश्यना ही सर्व मानवाला संबोधी कडे घेऊन जाणारी प्रक्रिया आहे. भगवान बुद्धांनी विपश्यना आणि अष्टशील हे जगातील मानवाला दिलेली मोठी देणगी आहे.
राहुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सत्याग्रह महाविद्यालयाचा पाली भाषा आणि संविधान पाठ शाळेच्या वतीने नियमित रविवारी विपश्यना वर्ग घेतले जातात. हे फार कुशल कार्य ही संस्था करत आहे असे हिंगमिरे म्हणाले.
सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे यांनी संविधान वनात बोधी वृक्ष आणि अन्य फळे फुले आणि वनस्पती वृक्षाचे रोपण केले.ह्या प्रशंगी डिंगळे यांनी बोधिवृक्ष आणि त्रिपितकाचे महत्व सागितले.ते पुढे म्हणाले २० व्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेकरांनी मुंबई सिद्धार्थ महाविद्यालय आणि नवी मुंबईत एकविसाव्या शतकात सत्याग्रह महाविद्यालयात पाली भाषेचा अभ्यासक्रम सुरू करुन भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची शिकवणूक सुरू केले आहे. संस्थेच्यावतीने आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या वर्षावासातील तीन महिने तलोजे येथे अखंड त्रिपिटक पारायाणाचा कार्यक्रम संस्थेने ठेवला आहे. याचा लाभ सर्व बांधवांनी घ्यावा असे दिनेश डिंगळे यांनी नाले म्हणाले. या संस्थेने अखंड त्रिपिटक पठणाचा कार्यक्रम ठेवून देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील बौद्ध अनुयायांच्या पुढे एक नवा आदर्श बौद्ध संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्यासाठी हाती घेतला आहे ही बाब अत्यंत गौरवपूर्ण आणि मार्गदर्शनी आहे. याचं अनुकरण महाराष्ट्रातील तमाम बुद्ध प्रिय नागरीक करतील असा विश्वास दिनेश डिंगळे व्यत केले.
प्राचार्या नेहा राणे, प्राचार्या सिंधू, प्रा. एम एल सूर्यवंशी, मुख्याध्यापिका सुजाता भोसले, मुख्याध्यापिका प्रमिला, प्राचार्या वनिता सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमाची यशस्वीतेसाठी तयारी केली.
अमरचंद हाडोळतीकर यांनी उपस्थितांना खीर दान दिले. या कार्यक्रमात पीपल्स एम्पॉवरमेंट सोसायटीचे सचिव हर्षल शाक्य यांनी फळे दान दिली.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी तळोजे या जागेवर विपश्यना केंद्र, सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण आणि बहुउद्देशीय सभागृह बांधण्यात येणार असा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जी.के. डोंगरगावकर यांनी संस्थेची गेल्या चार दशकांतील वाटचालीचा इतिहास व्यक्त केला.नागोठाणे तळोजे खारघर सीबीडी बेलापूर येथे तिने संस्थेने पुढील तीन वर्षात आधुनिक सुविधा आणि साधने असलेली शैक्षणिक संकुले उभरण्यात येणार असून आजी माजी विद्या्थी आणि दानशूर नागरिकांनी मदत करावी असे डोंगरगावकर म्हणाले. हिंदू सत्यशोडक संघाचे कार्यकर्ते लक्ष्मण ,नदुरबारकर ,आत्माराम ठाकूर,गोविंद बनसोडे किशोर पाटील उपस्थित होते असेच संस्थेचे पदाधिकारी डॉ.प्रतिभा, डॉ.प्रज्ञा,डॉ.प्रणिता,राजरत्न डोंगरगावकर,अजय कांबळे उपस्थित होते.कायक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »