Press "Enter" to skip to content

आयुक्त गणेश देशमुख यांनी केली अतिवृष्टी बाधित भागाची पहाणी

पनवेल : गेले दोन दिवस पनवेल कार्यक्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. समुद्रात आलेल्या भरतीमुळे शहराच्या अनेक सखल भागात पाणी साठले आहे. पापडीचा पाडा, इकट पाडा ,तळोजा मजकुर, घोट ,पडघे, पेंधर, कळंबोली नोड, तक्का या भागाची सकाळपासून आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी आज(19 जुलै) पहाणी केली. येथील समस्या जाणून घेऊन त्या प्रमाणे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अतिवृष्टी दरम्यान येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

वेधशाळेने 20 जुलै पर्यंत रायगड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच समुद्रामध्ये आलेल्या भरतीमुळे पनवेल शहर व इतर नोडमधील सखल भागात पाणी साठले आहे. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने खरबरदारी घेत आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतरण शाळा, क्रिडा संकुल समाजमंदिर अशा सुरक्षित ठिकाणी केले आहे. या ठिकाणी त्यांच्या जेवण, अल्पोपहार, पिण्याचे पाणी याची सोय करण्यात आली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी नागरिकांना महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. नागरिकांना समस्या असल्यास पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागास कळवावे अशा सूचना केल्या आहेत.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »