नवी मुंबई : भारतीय जनता पार्टीचे नवी मुंबई युवा सरचिटणीस रणजित नाईक यांच्या सतर्कतेमुळे सिवुड्स-दारावे येथील रस्त्यावर होणारा संभाव्य अपघात टळला. रस्त्यात वेळीच बॅरिगेटींग लावून घेतले आणि येणाऱ्या वाहन चालकांना सतर्क केले.
दारावे गावातील मुख्य रस्ता कमानी जवळील रस्त्यावरील चेंबर खचला होता. अचानक येणाऱ्या वाहनाचा अपघात होण्याची शक्यता होती. दिवसभर पाऊस सुरु असल्याने वाहन अपघाताचा धोका अधिक आहे. कोणतीही दुर्घटना होऊ नये, म्हणुन रणजित नाईक यांनी तातडीने लक्ष घालुन बॅरिगेटींग करुन घेतली. नवी मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी सुचित केले.





