Press "Enter" to skip to content

धनगर ऐक्य परिषदेच्या पार्लमेंटरी बोर्डावर मल्लिकार्जुन पुजारी यांची निवड !

नवी मुंबई : धनगर समाजाच्या न्याय-हक्कासाठी लढणाऱ्या धनगर ऐक्य परिषदेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य पदावर धनगर समाजाचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन पुजारी यांची निवड करण्यात आली आहे. मल्लिकार्जुन पुजारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आहेत.

राज्यातील धनगर समाजाचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. अनेक पक्षांची सत्ता आली, गेली मात्र धनगर समाजाचे प्रश्न प्रलंबित आहेत. आतापर्यंत धनगर समाजाला फक्त आश्वासने देऊन सत्ताधाऱ्यांनी समाजाचा वापर करून घेतला. त्यामुळे समाजाचे प्रश्न काय आहेत. आरक्षण आणि नोकरभरती याबाबत अद्यापि प्रश्न प्रलंबित आहेत. धनगर समाजाच्या संरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहेत. समाजाच्या सर्व प्रश्नाबाबत राज्यशासकडे आपण पाठपुरावा करणार असल्याची भूमिका मल्लिकार्जुन पुजारी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. समाजाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न कारेन, असा विश्वास देखील मल्लिकार्जुन पुजारी यांनी व्यक्त केला.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »