Press "Enter" to skip to content

सावधान ! पांडवकडा धबधब्यावर जाऊ नका ! १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू !

प्रतिनिधी, नवी मुंबई : खारघर येथील पांडवकडा धबधब्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री घडली .मृत तरुणाचे आणखी दोघे मित्र बुडत असताना थोडक्यात बजावले.

खारघर पोलीस ठाणे हद्दीत पांडवकडा येथे मानखुर्द गोवंडी येथील शालेय मित्र गौरव लोखंडे, अखीप खान, सुरज यादव, मौसम घरती, राहील खान असे पांडवकडा येथे मंगळवारी २२ जून रोजी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास आले होते . यावेळी गौरव लोखंडे, राहिल खान व मौसम घरती यांनी डोहामध्ये उड्या मारल्या. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे डोंगरातून पाण्याचा प्रवाह वाढला. सदर बाब त्यांच्या लक्षात न आल्याने पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. पाण्याच्या वाढत्या प्रवाहातून गौरव व राहील कसेबसे बचावले. मात्र , मौसम घरती हा वर आला नाही म्हणून नवी मुंबई कंट्रोलला कळविले.
अग्निशन दल आणि खारघर पोलिस जवान यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाण्याच्या प्रवासातून थोडक्यात वाचलेल्या दोन्ही तरुणांना सुरक्षित स्थळी हविले आणि मौसमचा शोध सुरु केला. पाण्यात गळ टाकून तसेच प्रत्यक्ष स्वीमर पाठवून त्याचा शोध घेतला, मात्र , काल रात्री सापडला नाही. आज सकाळी सडे नऊच्या सुमारास फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांनी सदर डोहातील खडकाखाली अडकलेले प्रेत बाहेर काढले. सदर मृत तरुण मौसम रामबहादुर घरती असल्याचे निषपन्न झाले. मौसम याचे वय १८ होते तो मानको मेडिकल जवळ, गोवंडी पश्चिम, मुंबई येथे राहणारा होता.

मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पावसाळा सुरू होताच प्रसार माध्यमांद्वारे पाडंवकडा येथे जाऊन नये, तेथे मृत्यु होवु शकतो, असे आवाहन केले होते. मात्र, तरीदेखील लोक आणि विशेषतः डोंगरातून पायवाटेने डोगंरातील धबधब्यात जातात व जीवनास मुकतात. खारघर डोंगरात जाऊन आपला जीव धोक्यात टाकू नये. आता तरी नागरिकांनी , विशेषतः तारुंनी धडा घ्यावा.

शत्रुघ्न माळी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, खारघर पोलीस ठाणे.

पोलीस प्रशासनाच्या आवाहनानंतर देखील नियम मोडून, कायदा मोडून तरुणपिढी आपला जीव धोक्यात का घालत आहेत, याबाबत तरुण पेढीची चिंता वाटते. तरुणांनी किमान आपल्या आई-वडिलांचा विचार करावा.

  • आर के दिवाकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष : नमो नमो भारत
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »