नवी मुंबई : खारघर शहरातील अनेक ठिकाणी वाढलेले घाणीचे साम्राज्य आज अखेर हटविण्यात आले. सिडको आणि पनवेल महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खारघर शहर अध्यक्षा राजेश्री कदम यांनी खारघरमध्ये स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ करून घेतला.
खारघर मधील इ विंग लगत असलेल्या अनेक होसिंग सोसायटीद्वारे वारंवार मागणी होत होती. विभागातील पदपथ ,मोकळी जागा तसेच रस्त्यावर कचरा टाकून घाणीचे थर साचले होते. यामुळे दुर्घनधीचे प्रमाण वाढले होते. पावसाळा सुरु झाल्याने साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका देखील वाढला होता. येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने राजश्री कदम यांनी सिडको आणि पनवेल मनपा प्रशासनाला येथील प्रश्नाची माहिती दिली. परिसरात पसरलेले घाणीचे साम्राज्य तातडीने हटवावे, अशे मागणी केली. प्रशासनाने राजेश्री कदम आणि गणेश शितोळे, मृणाल कदम यांचे आभार मानले.

अखेर, खारघरमधील घाणीचे साम्राज्य हटविले ! राजेश्री कदम यांचा पाठपुरावा !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




