प्रतिनिधी, नवी मुंबई :
सविधान पाठशाळा तळोजे, पनवेलच्या वतीने तथागत भगवान बुद्धांची 2565 वी जयंती रायगड महाविहार, संविधान वन,सेक्टर-26, तळोजा येथे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून ऑनलाईन तसेच ऑफलाईन संपन्न झाली.
पूज्य भदंत डॉ. ज्ञानदीप महाथेरो बुद्धगया यांनी त्रिसरण पंचशील देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली संस्था प्रमुखांनी भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पगुच्छ अर्पण करून आणि मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन केले.
या जयंतीच्या निमित्ताने प्राध्यापक वनिता सूर्यवंशी ललिता यशवंते रत्नमाला डोंगरगावकर, सुजाता भोसले यांनी बुद्ध जीवन मार्ग आचरणातील अडथळे आणि पळवाटा यावर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले. माजी समाज कल्याण आयुक्त आर.के.गायकवाड यांनी भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले बुद्ध धम्म आचरण आजच्या भारतातील समाजाला अत्यावश्यक आहे असे विचार मांडले.
देशातील झाडांची कत्तल, अन्नातील भेसळ, पर्यावरणाचा ऱ्हास, पाळीव आणि जंगलातील प्राण्यांची हत्या, औषध उपचाराविना होणारे मृत्यू आणि या काळात झालेले शोषण यावर वक्त्यांनी प्रकाश टाकला.
देशांमध्ये एक जात एक जात दुसऱ्या जातीचा तर एक धर्म दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करत आहे. दररोज अनुसूचित जाती जमाती वर जातीय अन्याय व अत्याचार केला जात आहे स्त्रियांवर बलात्कार केला जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि माध्यमांचा वापर असहिष्णुता वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत असे वक्त्यांनी आपले मत व्यक्त केले.
त्यांचा संदर्भ घेऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जी के डोंगरगावकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धम्मदीक्षा आणि आजचं वास्तव यावर आपले मत व्यक्त केले डोंगरगावकर म्हणाले देशातील अनुसूचित जाती जमाती जाती जमातीच्या 25 टक्के लोकांपैकी फक्त एक टक्का जातींनी धर्मांतर केले आहे. उर्वरित 24 टक्के जाती जमातींच्या लोकांनी जन्मजात धर्म सोडलाच नाही. म्हणून या संवर्गाला असमानता प्रिय आहे असेच म्हणून त्यांच्यावर स्वखुशीने भेदभाव कायमचा लावण्यास हरकत नाही असे समजून त्यांच्यावर त्यांच्यावर धार्मिक गुलामी कायमची राहील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या समाजाने धार्मिक दृष्ट्या स्वीकारले का? असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. सरकारी नोकरीतील भरती पदोन्नतीमध्ये नाकारलेला आरक्षण मिळण्यासाठीचे मोर्चे काढणारा लाभार्थी बुद्धधम्माच्या मार्गाने जाण्यास तत्पर नसल्याचे डोंगरगावकर म्हणाले. बढती नाकारणारा वर्ग ब्राह्मण्यवादी आहे. त्याच्यापासून सुटका कायमची करून घेण्यासाठी देशातील सर्व नागरिकांनी स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षापर्यंत बुद्ध जीवन मार्ग अनुपालन करणे देश हिताचे आहे ब्राह्मणांनी बुध्द काळापासून इसवीसन सातव्या शतकापर्यंत बुद्धधम्माच्या वाढीमध्ये आणि गतिमानतेमधे मोठे योगदान आहे. भिक्षु सारिपुत्त महामोद्गलायन आणि मनुस्मृती दहन कार्यक्रमाचे एक कार्यकर्ते गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे हे ब्राह्मण होते डोंगरगावकर म्हणाले. तसेच या सर्वांचे चिंतन देशातील सुजाण प्रबुद्ध ब्राह्मणांनी करण्याची आता वेळ आली आहे. जगाला युद्ध नको बुद्ध हवा हे सांगण्याची ऐतिहासिक जबाबदारी ब्राह्मणांवर आली आहे असे ते म्हणाले. पुढे डोंगरगावकर म्हणाले प्रमाणपत्रधारक नाही तर श्रद्धेने हृदय परिवर्तन करून सर्व जाती जमातींनी धर्मा पंतांनी बुद्ध धम्माच्या मार्गाने जाण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पैगाम असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाची कार्यक्रमाची सांगता धम्मपालन गाथा आणि राष्ट्रगीताने झाली. आभार सुजाता भोसले यांनी मानले.





