पनवेल : भाजप रायगड जिल्हा सचिव गीता चौधरी यांची भारत रक्षा मंचच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गीता चौधरी या कमलज्योती फाउंडेशनच्या संस्थापिका -अध्यक्षा आहेत.
भारत रक्षा मंचचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष सुर्यकांत केळकर गुरुजी यांनी नुकतेच गीता चौधरी यांची रायगड जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड केली. देश रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. ही जाणीव प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. देशसेवेसाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे, ही भावना निर्माण करण्यासाठी नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया गीता चौधरी यांनी व्यक्त केली.





