Press "Enter" to skip to content

धक्कादायक ! गृहमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपालांच्या बनावट पत्राद्वारे नवी मुंबईतील व्यापाऱ्याला धमकी ! नवी मुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल !

कोकण दर्पण ! कोकण LIVE
नवी मुंबई : देशाचे गृहमंत्री अमित शहा , राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या नावाने बनावट पत्रे तयार करून काश्मीर येथील एका होलसेल व्यापाऱ्याने एपीएमसी मार्केट नवी मुंबई येथील व्यापाऱ्याला धमक्यावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, नवी मुंबईतील व्यापारी सय्यद युसूफ यांनी न्यायासाठी नवी मुंबई पोलिसांकडे धाव घेतली आहे. सदर प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशी , नवी मुंबई येथील रहिवाशी असलेले सय्यद युसूफ हे सानपाडा येथील फळ मार्केटमध्ये एफ २४ व २५ गळ्यामध्ये व्यापार करतात. सन २०११-१२ पासून सय्यद युसूफ हे जम्मू काश्मीर येथील होलसेल सफरचंद व्यापारी गुलाम अहमद गनई यांच्याकडून सफरचंद घेत होते. मागील चार वर्षांपासून काश्मीरच्या व्यापारात नुकसान होत असल्याने काश्मीर येथील व्यापार बंद करण्याचा निर्णय सय्यद युसूफ यांनी घेतला. याबाबत युसूफ यांनी गुलाम अहमद गनई यांना सांगितले. मात्र, मागील ऑक्टोबर महिन्यापासून सदर व्यापारावरून गुलाम अहमद गनई यांचा मुलगा शमीम गनई आपणास धमकावत असल्याचे युसूफ यांचे म्हणणे आहे. मागील काही वर्षभरातील दीड कोटी रुपयांची रक्कम वसूल झालेली नसल्याचे सांगत शमीम गनई धमकावत असल्याचे युसूफ यांचे म्हणणे आहे. युसूफ यांना धमकावण्यासाठी शमीम गनई याने चक्क नॅशनल इव्हेस्टिगेशन एजन्सी, देशाचे गृमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचप्रमाणे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्या नावाने तयार केले बनावट पत्रांचा वापर केल्याचा धकाकदायक प्रकार उघडकीस आला आहे. शेवटी भयभीत झालेले सय्यद युसूफ यांनी न्यायासाठी नवी मुंबई न्यायालयात धाव घेतली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त व एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली. एपीएमसी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर जम्मू काश्मीर येथील व्यापारी गुलाम अहमद गनई यांचा मुलगा शमीम गनई याच्या विरोधात बनावट कागदपत्र तयार करणे , पैशांसाठी धमकावणे आदी कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अधिक तपस करीत आहेत.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »