Press "Enter" to skip to content

नवी मुंबईकरांनो सावधान, कोविड मृत्यूचा आकडा वाढतोय !

नवी मुंबई : नवी मुंबईतील कोरोना रूग्णांना वेेळेत उपचार मिळावेत, यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस उपायोजना कराव्यात, अशी परखड सुचना आमदार गणेश नाईक यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना १७ एप्रिल रोजी पत्र पाठवून आ. नाईक यांनी कोरोना रूग्णांची वाढती संख्या पहाता सर्वांना वेळेत उपचार द्यावेत आणि कोरोनाचे संभाव्य मृत्यू टाळावेत, असे निक्षून सांगितले आहे. आ. नाईक हे आयुक्त बांगर यांच्याबरोबर नियमितपण कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांच्या आढावा बैठका घेत असतात. या बैठकांमधून ते पालिका प्रशासनाला कोरोना नियंत्रणासाठी मौलिक सुचना करत असतात. पालिका प्रशासनाकडून त्यांना योग्य कार्यवाही सुरू असल्याचे आश्वासित केले जाते. परंतु काही स्तरांवर पालिका कमी पडत असल्याचे दिसून येते आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रूग्णसंख्येचा आलेख वेगाने वाढत असताना पूर्वी दिवसाला दोन ते तीन कोरोना मृत्यू होत असतं हा आकडा आता ९ पर्यंत पोहाचला आहे. मृत्यूदर वाढताना दिसतो आहे. साधे बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर बेड इत्यादींची उणिव जाणवते आहे. केअर सेंटर कमी पडत आहेत. गंभीर रूग्णांसाठी जीवरक्षक ठरलेले रेमडेसेवीर इंजेक्षन मिळत नाही. अशा प्रकारच्या असंख्य तक्रारी लोकनेते आ. गणेश नाईक यांच्याकडे नागरिकांनी केल्या आहेत. लोकनेेते आ. नाईक यांनी या समस्यांची गंभीर दखल घेतली आहे. सर्व प्रकारच्या बेडची संख्या, कोविड सेंटरची संख्या आणि रेमडेसेवीर सारख्या औषधांची उपलब्धता वाढविण्याची मागणी त्यांनी आयुक्त बांगर यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर वाढणारे कोरोना मृत्यू टाळण्यासाठी सुसज्ज आरोग्य यंत्रणा उभारण्याची सुचनाही त्यांनी केली आहे. नवी मुंबईतील एकही रूग्ण उपचाराअभावी मागे राहता कामा नये, सर्वांना वेळेत उपचार मिळायला हवेत, अशी निर्वाणिची सुचना लोकनेते आ. नाईक यांनी केली आहे.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »