Press "Enter" to skip to content

खारघरमध्ये रक्तदानाद्वारे बाबासाहेबांना आभिवादन !

पनवेल : महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने रक्तदान करून खारघरवासियांनी महामानवाला अभिवादन केले. रक्तदान शिबिरात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. बाबासाहेबांनी मानवतेचा संदेश दिला. कोरोनाकाळात रक्तदान करून इतरांचे जीवन वाचविण्यात आपले योगदान देणे हीच खरी मानवता होय, अशी भावना यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस खारघर शहर अध्यक्षा राजश्री कदम यांनी यावेळी व्यक्त केली.

श्री साई असोसिएशन खारघर, शंभुराजे मित्र मंडळ खारघर, ईश फाऊंडेशन खारघर या सामाजिक संस्थानी राबविलेल्या रक्तदान शिबिराला खारघर वासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी जवळ जवळ २५ लोकांनी रक्तदान केले. शंभूराजे मित्र मंडळातील अनेक युवकांनी देखील रक्तदान केले. शंभूराजे मित्र मंडळाच्या संस्थापिका राजश्री कदम, साई असोसिएशनचे सचिव गणेश शितोळे तसेच संस्थापक विश्वासराव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबीर संपन्न झाले. सौ संगीता पवार रोहन कदम ,सागर कदम, बाळासाहेब आव्हाड, जितू पळके,संदेश खंडागळे, अखिलेश पवार, अनिकेत साबळे, प्रतीक तांबे, नवीन चीचाले, अमोल गवर्गुर, राहुल नरवडे, कार्तिक काकडे, राज कदम, पंदरे पॅडी , विशाल डिके , रोहन माने, वैभव यादव, वैभव काळे, तेजस फाळके आदींनी शिबीर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »