Press "Enter" to skip to content

कुकशेत ग्रामस्थांच्या न्यायहक्कासाठी सुरज पाटील यांचे बेमुदत उपोषण !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कुकशेत गावातील ग्रामस्थांच्या न्याय-हक्कासाठी माजी नगरसेवक सुरज पाटील यांनी एल्गार पुकारला आहे. जोपर्यंत ग्रामस्थांना न्याय मिळणार नाही, तो पर्यंत बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार सुरज पाटील यांनी केला आहे. आज चौथ्या दिवशी देखील सुरज पाटील यांचे उपोषण सुरूच आहे.

नेरुळ विभागातील कुकशेत गावातील ग्रामस्थांनी एमायडीसीला जमिनी दिल्या, त्यामोबदल्यात एमआयडिसीने नोकऱ्या दिल्या. मात्र, नोकरी मिळालेले ग्रामस्थ आता सेवा निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी त्यांच्या वारसांना नोकरी देण्याची मागणी सुरज पाटील यांनी केली आहे.
संदीप हेमंत पाटील या युवकाला दिलेले लेखी आश्वासनाची त्वरित पूर्तता करून नोकरी देण्यात यावी, ज्या ग्रामस्थांना अजून ट्रेनी म्हणून वेळ वाढवून ठेवली आहे, त्यांना त्वरित कायम स्वरूपी कामगार म्हणून रुजू करण्यात यावे, मंदिर व इतर पुनर्वसित गावातील विषयांमध्ये कंपनीने स्वतःची जबाबदारी स्वीकारावी, कुकशेत गावातील संपादित जमिनीवर कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पात कुकशेत ग्रामस्थांनाच नोकरीमध्ये समाविष्ट करण्याचा लेखी करारनामा करण्यात यावा, आदी इतर मागण्यांचा समावेश आहे.

कोकण दर्पण ! कोकण LIVE

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »